नवी दिल्ली : तुमचा स्मार्टफोन तुटण्याची किंवा हॅक होण्याची धास्ती तुम्हालाही वाटतेय? उत्तर होय असेल तर तुमच्यासाठी आलाय एक असा स्मार्टफोन जो न तुटणार, ना कुणी त्याला हॅक करू शकणार.
या फोनचं नाव आहे टुरिंग फोन... हा फोन पुढच्या महिन्यात तुमच्या हातात येण्याची शक्यता आहे.
या फोनचं वैशिष्ट्यं म्हणजे हा फोन 'लिक्विडमोरफियम'पासून बनवण्यात आलाय. त्यामुळे, तो स्टील आणि अॅल्युमिनियमहून जास्त मजबूत आहे. उल्लेखनीय म्हणजे, 'अॅपल'ही आपले आयफोन बनवतानाता सिम कार्डच्या जागेसाठी लिक्विडमोरफियमचा वापर करतात.
टुरिंग फोनचा स्क्रिन ५ इंचाचा असेल. यामध्ये अॅन्ड्राईड ५.१ ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आलाय. पण, या फोनचा ड्रॉ बॅक म्हणजे यामध्ये यूएसबी पोर्ट किंवा म्युझिकसाठी ऑडिओ ज२क नाही. या फोनमध्ये केवळ ब्लूटूथ काम करतो.
पण, हा फोन चुकूनही कधी तुमच्या हातातून पाण्यात पडला किंवा पावसात भिजला तरी आरामात त्याला पाण्याबाहेर काढा आणि पाणी पुसून नेहमीप्रमाणे वापरण्यास सुरूवात करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.