स्लो कनेक्शनमध्ये फास्ट इंटरनेटसाठी काही खास टिप्स

सोशल कनेक्टिव्हिटी असो, शॉपिंग किंवा मनोरंजन असो इंटरनेट स्पी़ड आणि सुरक्षित इंटरनेट कनेक्शन ही सगळ्यांचीच गरज बनली आहे. 

Updated: Jul 13, 2015, 03:58 PM IST
स्लो कनेक्शनमध्ये फास्ट इंटरनेटसाठी काही खास टिप्स  title=

मुंबई : सोशल कनेक्टिव्हिटी असो, शॉपिंग किंवा मनोरंजन असो इंटरनेट स्पी़ड आणि सुरक्षित इंटरनेट कनेक्शन ही सगळ्यांचीच गरज बनली आहे. 

२ जी आणि ३ जीच्या जमान्यातसुद्धा मोबाईलधारक स्‍लो इंटरनेट स्‍पीडमुळे नेहमी त्रस्त असतात. यासाठी काही खास असे टिप्स आहेत ज्यामुळे स्लो कनेक्शनमध्ये फास्ट इंटरनेट स्पी़डची मज्जा घेऊ शकतात.
 
- तुम्ही इंटरनेटचा वापर मोबाईलवर करत असाल किंवा लॅपटॉपवर. ब्राउजर आणि सिस्टिमचा कॅशे नेहमी रिकामा केला पाहिजे. यामुळे फक्त तुमचा ब्राउजिंग स्‍पीडचं वाढत नाही तर प्रायव्हसी पण राखली जाते. 
- इंटरनेट सर्फिंग करताना आपण अशा वेबसाइट उघडतो ज्याची आपल्याला पुन्हा गरजही पडत नाही. हे सगळ कॅशे मेमरीमध्ये स्टोर होते. हा स्टोर झालेला डेटा हार्डडिस्कची बरीच जागा खातो. याचा परिणाम इंटरनेटच्या स्पी़डवर होतो.
- तसेच कॅशे मेमरी रिकामी न करण्याची अजून अजून एक समस्या आहे ती म्हणजे वेबसाइटसकट युजर्सचा पासवर्डही सेव्ह करतो. त्यामुळे नंतर जो व्यक्ती तो कंप्युटर वापरतो तो तुमचा पासवर्ड बघू शकतो.
- कुकिज कॅशेबरोबर ब्राउजरचे कुकिजसुद्धा प्रायव्हसीसाठी धोकादायक आहे. 
- मोबाईलच्या अॅप्सचा कॅशेसुद्धा रिकामे करणे तितकेच गरजचे आहे. अॅंडरॉइड  स्मार्टफोनपासून विंडोज तसेच आयओएस युजर्सना असे अॅप्स आहेत की जे एका ते दोन क्लिकवर तुमचे डिव्हाइस तसेच ब्राउजरची कॅशे मेमरी रिकामी करतात.  
- क्लिनमास्टर, सीक्लिनर, अवास्ट क्लिनअप, एवीजी क्लिनर सारखे विनामुल्य अॅप्स आहेत जे खूप फायदेशीर ठरतात.
- विंडोज फोन युजर्ससाठी पण अॅपस्टोरमध्ये क्लिनमास्टर, सीक्लिनर सारखे प्रभावी अॅप्स आहेत.  
- आयओएस युजर्ससाठी थोडे कमी पर्याय आहेत तरी ३६० सिक्युरिटी ते इंस्टॉल करू शकतात. 
- याव्यतिरिक्त जर तुम्हाला कुठलेच अॅप्स इंस्टॉल करायचे नसतील तरी सेटिंग्समध्ये जाऊन एक-एक करून सगळ्या अॅप्सची कॅशे डिलीट करू शकता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.