नवी दिल्ली : गूगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येक वर्षी जवळपास २० लाख लोक अर्ज करतात आणि त्यातील केवळ ५००० जणांनाच ही संधी मिळते. गुगलचे 'पीपल ऑपरेशन हेड' लॅजलो बॉक यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंपनीत भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध पायऱ्यांबद्दल महत्त्वाचा खुलासा केलाय.
बॉक हे गूगलमध्ये २००६ पासून कार्यरत आहे... गूगल स्टाफच्या नियुक्तीचं कामकाज ते पाहतात. बॉक लवकरच आपलं 'वर्क रुल्स' हे पुस्तक प्रकाशित करणार आहे. यामध्ये, त्यांनी गूगलमध्ये उमेदवारांची निवड कशी केली जाते, याबद्दल खुलासा केलाय.
गूगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी चार गोष्टी आवश्यक आहेत. पहिला म्हणजे, जनरल कॉग्निटिव्ह एबिलिटी... म्हणजेच केवळ इंटलिजन्स नाही तर अर्जदारामध्ये मिळालेल्या सूचना कार्यान्वित करण्याची योग्यताही हवीय.
दुसरं म्हणजे इमर्जेट लीडरशीप... म्हणजेच जर तुम्हाला एखादी समस्या आढळली तर तुम्ही त्यात सहभागी होता का? आणि ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता का? तसंच जेव्हा तुमची गरज संपेल तेव्हा त्यातून सहज बाहेर पडू शकता का?
तिसरी गोष्ट म्हणजे कल्चरल फिट... गूगलच्या भाषेत गूगलीनेस...
आणि चौथी म्हणजे ज्या कामासाठी तुमची नियुक्ती केली जातेय त्यामध्ये तुम्ही एक्स्पर्ट असायला हवं.
बॉक यांनी आपल्या पुस्तकात याबद्दल अनेक खुलासे केलेत. बॉक यांच्यानुसार, गूगलमध्ये कामकाजासाठी पोषक अशा वातावरणाशिवय अनेक सब्सिडाइस्ड चाइल्डकेअर, डॉग सिटिंग, मसाज चेअर यांसारख्या सुविधा मिळतात.
प्रत्येक सोमवारी गूगलमध्ये हेअरड्रेसर्स येतात आणि प्रत्येक मंगळवारी मॅकेनिक येऊन कार सर्व्हिस करतात. एव्हढंच नाही तर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर पुढच्या दहा वर्षांपर्यंत त्याच्या पगाराचा ५० टक्के भाग त्याच्या पार्टनरला दिला जातो. तसंच गूगल लगेचच कर्मचाऱ्याच्या पार्टनरला त्याच्या अनवेस्टेड स्टॉकची किंमत आणि जर त्यांची मुलं आहेत तर त्यांच्यासाठी हजार डॉलर प्रति महिना देतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.