स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट टाळण्यासाठी या ५ गोष्टी करा

स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होणे अथवा स्मार्टफोनने पेट घेतल्याच्या घटना हल्ली वाढू लागल्यात. अनेकदा आपल्या चुकांमुळे तर कधी स्मार्टफोनमध्येच बिघाड असतो यामुळे अशा घटना घडतात. ही घटना आपल्या बाबतीत घडू नये यासाठी खालील गोष्टी अवश्य करा.

Updated: Sep 24, 2016, 02:06 PM IST
स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट टाळण्यासाठी या ५ गोष्टी करा title=

मुंबई : स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट होणे अथवा स्मार्टफोनने पेट घेतल्याच्या घटना हल्ली वाढू लागल्यात. अनेकदा आपल्या चुकांमुळे तर कधी स्मार्टफोनमध्येच बिघाड असतो यामुळे अशा घटना घडतात. ही घटना आपल्या बाबतीत घडू नये यासाठी खालील गोष्टी अवश्य करा.

स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी या ५ गोष्टीं आवश्यक

१. यूएसबी- स्मार्टफोनला चार्जिंग करण्यासाठी यूएसबीचा वापर करा. चार्जिंग होण्यासाठी वेळ लागेल पण यामुळे तुमचा फोन गरम होणार नाही.

२. ओरिजनल बॅटरी आणि चार्जर- स्मार्टफोनबाबतीत सर्व प्रोडक्ट ओरिजनल असणं गरजेचं आहे. 

३. कव्हर काढावे-  चार्जिंगला लावताना स्मार्टफोनचं कव्हर काढायला विसरु नका.

४. चार्जिंगच्या वेळी फोनवर बोलणं टाळा

५. स्मार्टफोन जास्त वेळ अधिक उष्णता असलेल्या ठिकाणी ठेवू नका