ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटनं गंडवलं तर काय कराल...

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटस् ग्राहकांना खूप भावल्यात... एका क्लिकसरशी तुम्ही दिलेल्या पत्त्यापर्यंत पोहचून विविध वस्तू आणि सुविधा तुम्हाला मिळत असल्यानं ग्राहकही या ऑनलाईन सुविधांना प्राधान्य देतात. पण, सध्या वाढलेल्या ऑनलाईन सुविधांसोबत ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकरणांतही वाढ झालेली दिसतेय. 

Updated: Jan 20, 2015, 01:58 PM IST
ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटनं गंडवलं तर काय कराल...  title=

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटस् ग्राहकांना खूप भावल्यात... एका क्लिकसरशी तुम्ही दिलेल्या पत्त्यापर्यंत पोहचून विविध वस्तू आणि सुविधा तुम्हाला मिळत असल्यानं ग्राहकही या ऑनलाईन सुविधांना प्राधान्य देतात. पण, सध्या वाढलेल्या ऑनलाईन सुविधांसोबत ऑनलाईन फसवणूकीच्या प्रकरणांतही वाढ झालेली दिसतेय. 

अशीच घटना घडली दिल्लीच्या वरिष्ठ सरकारी अधिकारी असलेल्या योगेंद्र गर्ग यांच्यासोबत... योगेंद्र यांनी काही दिवसांपूर्वी स्नॅपडीलमधून 'नाईकी एअर मॅक्स' शूजचा एक जोड ऑर्डर केला होता. याची किंमत होती 9,445 रुपये... 

योगेंद्र यांच्या घरी हे शूज जेव्हा डिलिव्हर झाले तेव्हा त्यांना चांगलाच धक्का बसला. योगेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे शूज सुरतहून आले होते. किंमतीमध्ये योगेंद्र यांना व्हॅट चार्ज करण्यात आला होता. पण, चलानवर जे टिन नंबर आणि सीएसटी रजिस्ट्रेशन नंबर लिहिलेला होता त्यावर 'लागू नाही' असा उल्लेख करण्यात आला होता. ही सरळ सरळ फसवणूक होती. धक्कादायक म्हणजे, यावर प्रोडक्ट कंपनीच्या वेबसाईटचा अॅड्रेसही चुकीचा लिहिलेला होता. यावर, nikebetterworld.com च्या ऐवजी nikebetterwold.com असं लिहिण्यात आलं होतं. 'स्नॅपडील'नं आपली शुद्ध फसवणूक केल्याचं योगेंद्र गर्ग यांनी स्पष्टपणे म्हटलंय. 

स्नॅपडीलच्या एका प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, स्नॅपडीलच्या नावावर नकली वस्तू विक्रेत्यांवर कंपनी कारवाई करते. गर्ग यांनी 'स्नॅपडील'ला वस्तू परत पाठवायची तयारी केलीय. त्यांनी याबाबत 'स्नॅपडील'कडेही संपर्क केला. परंतु, एक आठवडा उलटला तरी अजून 'स्नॅपडील'कडून कोणतंही उत्तर मिळालेलं नाही.

ग्राहक काय करू शकतात...
'स्नॅपडील' हा एकच ई-रिटेलर नाही ज्याच्या वेबसाईटद्वारे ग्राहकांची फसवणूक होते... यापूर्वीही दिल्लीच्या गुडगावच्या 'शॉपक्लूज' या बेवसाईटला नकली सामान विकल्याप्रकरणी हायकोर्टानं दणका दिला होता. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर या वेबसाईटला दिल्ली हायकोर्टानं या कंपनीला कोणतंही सामान बनवण्यासाठी, विकण्यासाठी, पुरवण्यासाठी किंवा डिस्प्ले करण्यासाठी बंदी घातलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.