६० फुट खोल विहिरीत पडणारा बिबट्याला असं वाचवलं

Updated: Aug 11, 2016, 11:12 PM IST

मुंबई : सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, सुमारे ६० फूट खोल विहिरीत बुडणाऱ्या बिबट्याला वनविभाग आणि गावातील लोकांनी पिंजरा टाकून वाचवलं आहे. बिबट्यानेही पाण्यात बुडण्यापेक्षा जेरबंद होण्याचं शहाणपण स्वीकारल्याने तो वाचला. बिबट्याला कसं वाचवण्यात आलं, ते पाहा या व्हिडीओत, हा व्हिडीओ नेमका कधी आणि कुठे काढण्यात आला आहे हे नमूद करण्यात आलेलं नाही, पण लोकांच्या बोलण्यावरून हा महाराष्ट्रातलाच असल्याचं सांगण्यात येत आहे.