मुंबई: सॅमसंगनं नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय, यात सॅमसंग S6 आणि S6 EDGE स्मार्टफोनची ड्रॉप टेस्ट घेतली गेलीय.
सॅमसंगच्या या व्हिडिओत खास असं काही नाही, पण आपण पाहू शकतो की, शर्टाच्या खिशातून म्हणजे इतक्या उंचावरून फोन पडला तर या दोन्ही मॉडेल्सना काही नुकसान होत नाही.
व्हिडिओमध्ये फोन स्क्रीन आणि बॅक दोन्ही साइडनं पडतांना दिसतोय. पडल्यानंतरही फोन व्यवस्थित काम करतांना दिसतोय.
कंपनी व्हिडिओमध्ये फोनच्या डिझाइनची चर्चा करतांना सांगतेय की, या प्रकारच्या पडण्याच्या स्थितीमध्ये सर्वात पहिले फोनच्या अॅल्युमिनियम फ्रेमला झटका बसतो आणि फोनचा डिस्प्ले, इतर भाग सुरक्षित ठेवतो.
पाहा हा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.