मुंबई : सॅमसंग गॅलेक्सीने गेल्याचं महिन्यात फॅबलेट गॅलेक्सी नोट 7 लॉन्च केला आहे.
हा फॅबलेट जगात सर्वात चांगला असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं पण आता हे टॅबलेट कंपनी परत मागवणार आहे.
या फॅबलेटच्या बॅटरीत आग लागत असून याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कंपनीच्या अंतर्गत चौकशीनंतर, फॅबलेट परत मागवण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे.
'आम्ही याचे कारण लवकरात लवकर शोधू आणि यासंबधी पत्रकार परिषद घेऊ' अशी सॅमसंग कंपनीकडून घोषणा करण्यात आली आहे.