सॅमसंगच्या नफ्यात घट होण्याची शक्यता

सॅमसंगच्या तिमाही नफ्यात ६० टक्क्यांची घट येऊ शकते, असं सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने म्हटलं आहे. ही शक्यता गॅलेक्सी स्मार्टफोनच्या विक्रीत अपेक्षेपेक्षा कमी झालेला खप असू शकतो.

Updated: Oct 7, 2014, 06:27 PM IST
सॅमसंगच्या नफ्यात घट होण्याची शक्यता title=

मुंबई : सॅमसंगच्या तिमाही नफ्यात ६० टक्क्यांची घट येऊ शकते, असं सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने म्हटलं आहे. ही शक्यता गॅलेक्सी स्मार्टफोनच्या विक्रीत अपेक्षेपेक्षा कमी झालेला खप असू शकतो.

जगभरात मोबाईल आणि टीव्ही स्क्रीन बनवणाऱ्या सॅमसंग कंपनीने म्हटलं शेवटच्या तिमाहीत सॅमसंगला ३.८ अरब डॉलरची आवक होणार आहे.

सॅमसंग ही दक्षिण कोरियाची मोबाईल बनवणारी जगातली सर्वात मोठी कंपनी आहे.

सॅमसंगचे ऍपल, शाओमी, लेनोव्हापासून मोठी स्पर्धा होत आहे.

बाजारात स्वस्त स्मार्टफोनमुळे कंपनीचं प्रमुख मॉडेल गॅलेक्सीची विक्री कमी झाली आहे.

कंपनीने जारी केलेल्या एका वक्तव्यानुसार, एका मोठ्या स्पर्धेतही फोनची निर्यात थोडी वाढली आहे. यासोबत मार्केटिंगचा खर्चही वाढला आहे. आणि फोनची सरासरी किंमतीत कमी झाल्याने, कंपनीचा नफा मात्र कमी होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.