नवी दिल्ली: सॅमसंगनं आज आपला सर्वात चर्चेत असलेला टायझेन ऑपरेटिंग सिस्टम स्मार्टफोन लॉन्च केलाय. साऊथ कोरियन दिग्गज कंपनीनं आज दिल्लीत एका मोठ्या इव्हेंटमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च केला.
टायझेन स्मार्टफोनबाबद अनेक दिवसांपासून स्मार्टफोन युजर्समध्ये चर्चा होती आणि याबद्दल अनेक अंदाजही बांधले जात होते. सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्सचे प्रेसिडंट आणि सीईओ ह्यून चिल हाँग यांनी सांगितलं, 'भारतात स्मार्टफोन्सचं मार्केट सतत वाढतंय. यूजर्स आपलं डिव्हाइस व्हिडिओ, टिव्ही प्रोग्रॅम्स, व्हिडिओ गेम्स आणि अनेक अॅप्ससाठी यूज करत आहेत.'
सॅमसंगनं टायझेन स्मार्टफोनसाठी मोबाईलवर लाइव्ह टिव्हीची सर्व्हिस देणारी कंपनी nexGTv आणि BoxTV सोबत एक खास डील केलंय. या डीलनंतर युझर 7000हून अधिक बॉलिवूड आणि हॉलिवूड फिल्म्स पण स्मार्टफोनवर पाहू शकतील. यासाठी आपल्याला 1750 रुपये इतकी किंमत मोजावी लागेल. सॅमसंगनं hungama.com सोबतही एक डील केलंय. ज्याद्वारे आपण म्यूझिक स्ट्रीमिंग आणि डाउनलोड पण करू शकता.
गूगलचं नवं ऑपरेटिंग सिस्टम 'अँड्रॉइड वन'ला टक्कर देण्याच्या इच्छेनं सॅमसंगनं टायझेन ऑपरेटिंग सिस्टम असलेला स्मार्टफोन लॉन्च केलाय. सॅमसंगनं पहिले टायझेन ऑपरेटिंग सिस्टमला भारतात लॉन्च करणार नव्हती. सॅमसंग टायझेन ऑपरेटिंग सिस्टममुळे भारताच्या बजेट स्मार्टफोन मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतेय.
सॅमसंग टायझेन झेड 1 स्मार्टफोनचे फीचर्स -
- यात 4 इ्ंचची 480x800 पिक्सेल असलेला TFT डिस्प्ले आहे.
- 1.2GHz असलेला A7 डुअलकोर प्रोसेसर लागलाय सोबतच 768MB ची रॅम आहे.
- 4 जीबीची इंटरनल स्टोरेज कॅपॅसिटी फोनची आहे. त्यात एसडी कार्डद्वारे तुम्ही 64जीबीपर्यंत वाढवू शकता.
- Samsung टायझेन Z1 स्मार्टफोन मध्ये 3.1MP रिअर कॅमेरा आणि फ्रंटला VGA कॅमरा दिलाय.
- Samsung टायझेन Z1 मध्ये 1500 mAh बॅटरी आहे.
- Samsung नं टायझेन Z1 की किंमत 5,700 रुपये ठेवलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.