मुंबई : नव्या वर्षाला ग्राहकांसाठी एका नव्या कोऱ्या आणि स्वस्त अशा स्मार्टफोनची घोषणा करत 'सॅमसंग'नं बाजारात एकच खळबळ उडवून दिलीय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंग लवकरच आपला फ्लॅगशिप फोन 'गॅलक्सी एस ७' लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या फोनच्या माध्यमातून 'सॅमसंग' आयफोनला टक्कर देण्यासाठी सज्ज झालीय.
उल्लेखनीय म्हणजे, कंपनीचे याआधी आलेले दोन स्मार्टफोन 'गॅलक्सी एस ६' आणि 'नोट ५' यांना आयफोनच्या तुलनेत म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
'गॅलक्सी एस ७'ची काही वैशिष्ट्ये...
- गॅलक्सी एस ७ मध्ये ५.५ इंचाचा फूल एचडी डिस्प्ले असेल
- १.७ गीगा हर्टझचा ऑक्टा कोर प्रोसेसर
- ३ जीबी रॅम
- १६ जीबी इनबिल्ट मेमरी (१२८ जीबी एक्स्पान्डेबल)
- अँन्ड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम
- १३ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
- कनेक्टिव्हिटीसाठी ४जी, एलटीआय वाय-फाय ८२०, ब्लूटूथ ४.१ आणि टाईप सी यूसीबी पोर्ट उपलब्ध असेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.