रॉयल एनफिल्डची ४११ सीसी 'हिमालयन' लॉन्च!

आपल्या दमदार आणि शानदार बुलेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्डची बहुप्रतिक्षित 'हिमालयन' ही बुलेट मंगळवारी अधिकृतरित्या लॉन्च करण्यात आलीय. 

Updated: Feb 2, 2016, 11:06 PM IST
रॉयल एनफिल्डची ४११ सीसी 'हिमालयन' लॉन्च! title=

नवी दिल्ली : आपल्या दमदार आणि शानदार बुलेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्डची बहुप्रतिक्षित 'हिमालयन' ही बुलेट मंगळवारी अधिकृतरित्या लॉन्च करण्यात आलीय. 

या बाईकचं वैशिष्ट्यं म्हणजे, संपूर्णत: भारतात निर्माण करण्यात आलेली ही देशातील पहिली अॅडव्हेन्चर बाईक आहे. या बाईकसोबत रॉयल एनफील्डनं भारतात बाईकच्या एका नव्या सेगमेंटमध्येही प्रवेश केलाय. 

या बाईकमध्ये सिंगल सिलिंडर इंजन ४ स्ट्रोक आहे. यामध्ये ४११ सीस, २ - वॉल्वसोबत लॉन्ग स्ट्रोक आणि एअर कुल्ड आहे. ही बाईक ४,५०० rpm वर ३.३kg ची डिलीव्हरी देते. या बाईकच्या मेन्टेनन्सचा खर्चही इतर बाईकपेक्षा कमी असेल, असं म्हटलं जातंय. एकदा सर्व्हिस केल्यानंतर १०,००० किलोमीटर पूर्ण होईपर्यंत या बाईकला सर्व्हिसिंग करण्याची गरज भासणार नाही.

कंपनीनं अद्याप या बाईकच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. या बाईकचं कमर्शिअल लॉन्च मार्च महिन्यात होणार आहे त्याचवेळी त्याच्या किंमतीचाही खुलासा होईल. 

रॉयल एलफिल्ड हिमालयनचे स्पेसिफिकेशन्स

Engine – 410cc, single-cylinder, oil-cooled 

Maximum power – 24.5bhp at 6500rpm 

Maximum torque – 32Nm at 4000 – 4500rpm 

Transmission – 5-speed constant mesh 

Length – 2190mm 

Width – 840mm 

Height – 1360mm 

Wheelbase – 1465mm 

Ground clearance – 220mm 

Fuel tank capacity – 15-litres

Kerb weight – 182kgs 

Front tyre – 90/90 21-inches 

Rear tyre – 120/90 17-inches

Front brakes – 300mm disc, 2-piston floating calliper 

Rear brakes – 240mm disc, single piston floating calliper

Chassis & Suspension 

Tyre – Half-duplex split cradle frame 

Front suspension – Telescopic, 41mm forks, 200mm travel 

Rear suspension – Monoshock with linkage, 180mm wheel travel

Royal Enfield Himalayan Estimated Price – Rs 1.70 lakh – Rs 2 lakh (ex-showroom) 

Royal Enfield Himalayan launch – Mid-March 2016