'रॉयल एनफिल्ड'नं महागड्या 'हार्ली डेव्हिडसन'ला पछाडलं

आणखी एका भारतीय कंपनीनं आपला ठसा जगभरात उमटवलाय. दमदार बाईक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रॉयल एनफिल्ड'नं नुकतंच हार्ली डेव्हिडसनला पछाडलंय.

Updated: Feb 2, 2015, 01:12 PM IST
'रॉयल एनफिल्ड'नं महागड्या 'हार्ली डेव्हिडसन'ला पछाडलं title=

मुंबई : आणखी एका भारतीय कंपनीनं आपला ठसा जगभरात उमटवलाय. दमदार बाईक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रॉयल एनफिल्ड'नं नुकतंच हार्ली डेव्हिडसनला पछाडलंय.

2014 या वर्षात रॉयल एनफिल्डनं आपल्या तब्बल 3 लाखांहून जास्त बाईकसची विक्री केलीय... तर विक्रीच्या बाबतीत महागडी हार्ली डेव्हिडसन मागे पडलीय... हार्ली डेव्हिडसन केवळ 2.67 लाखांचा टप्पा गाठू शकलीय.  

रिव्हेन्यूच्या बाबतीत मात्र हार्ली डेव्हिडसननं बाजी मारलीय. कमी बाईक विक्रीनंतरही हार्ली रॉयल एनफिल्डच्या पुढे आहे. याचं कारण म्हणजे, हार्ली डेव्हिडसन 700 सीसीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या बाईक बनवतात... 

भारतामध्ये हार्लीची स्वस्तात स्वस्त बाईक 5 लाख रुपयांना उपलब्ध आहे. तिथे रॉयल एनफिल्ड 535 सीसीपर्यंतच बाईक बनवतात. भारतामध्ये रॉयल एनफिल्डची किंमत 2 लाखांपर्यंत आहे. 

2004-05 पर्यंत रॉयल एनफिल्डची अवस्था बिकट होती. परंतु, क्लासिक, न्यू थंडरबर्ड आणि कॉन्टिनेन्टल जीटीसारखे नवनवीन मॉडल्स आणून रॉयल एनफिल्डनं आपलं वर्चस्व बाजारावर प्रस्थापित केलं. 

2014 या वर्षात रॉयल एनफिल्डची विक्री जगभरात 70 टक्क्यांनी वाढलीय.... तर हार्ली डेव्हिडसनची केवळ 3 टक्क्यांनी...

चेन्नई स्थित भारतीय कंपनी रॉयल एनफिल्ड जगभरातील सगळ्यात जुन्या मोटारसायकल कंपन्यांपैंकी एक आहे. ही भारतात दाखल होण्याअगोदर ब्रिटिश कंपनी होती पण 1995 मध्ये आयशर मोटर्स लिमिटेनं ही कंपनी खरेदी केली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.