मुंबई : आज राज्यात पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. अनेकजण आपली कार, बाईक धुण्यासाठी सर्व्हीस सेंटर गाठतात. त्यासाठी तुम्ही ८० रुपयांपासून २०० रुपये मोजता. मात्र, तुम्ही घरीच कार धुवू शकता तेही ३ रुपयांमध्ये. गाडी धुण्यासाठी केवळ ८ लिटर पाणीही पुरते.
सर्व्हीस सेंटरमध्ये गेले की बाईक साध्या पाण्याने धुवायची असेल तर ८० रुपये पडतात. तर कारसाठी १५० रुपये मोजावे लागतात. तर साबन आणि ऑईलने धुण्यासाठी बाईला १२० रुपये तर कारला २०० रुपये द्यावे लागतात. मात्र, वेळ, पैसा आणि पाणी बचत करण्यासाठी तुम्ही हे कार वॉशर वापरले तर एकाच यंत्रात अनेक कामे कमी वेळात होतात. आणि तुमचे पैसेही वाचतात. या कार वॉशरची किंमत २१९९ रुपये.