रिलायन्स जिओ 15 डिसेंबरला नवी सेवा देणार, पहिले 6 महिने सेवा मोफत

रिलायन्स जिओ आणखी एक ग्राहकांना सुखद धक्का देणार आहे. रिलायन्स आपली DTH सेवा सुरु करणार आहे. या सेवेसाठी खास वेलकम ऑफर ठेवणार आहे. त्यामुळे पहिले सहा महिने DTH सेवा घेणाऱ्यांना मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे, तशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली.

Updated: Nov 17, 2016, 08:31 PM IST
रिलायन्स जिओ 15 डिसेंबरला नवी सेवा देणार, पहिले 6 महिने सेवा मोफत title=

मुंबई : रिलायन्स जिओ आणखी एक ग्राहकांना सुखद धक्का देणार आहे. रिलायन्स आपली DTH सेवा सुरु करणार आहे. या सेवेसाठी खास वेलकम ऑफर ठेवणार आहे. त्यामुळे पहिले सहा महिने DTH सेवा घेणाऱ्यांना मोफत सब्सक्रिप्शन मिळणार आहे, तशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली.

उद्योगपती मुकेश  अंबानी यांची रिलायन्स जिओ ही सेवा लवकरच सुरु करणार आहे. त्यासाठी 15 डिसेंबर 2016 पर्यंत लॉन्च करण्याची शक्यता GIBOTच्या रिपोर्टने दिली आहे. जिओ दर महिना 185 रुपयांत ही सेवा उपलब्ध करण्याची शक्यता आहे.

रिलायन्स जिओची DTH सेवा हायस्पीड असणार आहे. याचा स्पीड 1 जीबीपीएस असेल. तसेच कंपनी याशिवाय आपल्या ग्राहकांना हायस्पीड इंटरनेट आणि जिओच्या सेवेसोबत अन्य लाभ देणार आहे. आपल्याला एक सेटटॉप बॉक्स, तसेच त्याच्यासोबत अॅंड्राइड स्मार्टबॉक्स किंवा अॅप्पल टीव्ही मिळणार आहे. तुम्ही विविध गेम्सही खेळण्याचा आनंद लूट शकता. जिओच्या या नवीन सेवेचे नाव असणार JioTV. एकून 360 चॅनेल्स उपलब्ध होणार आहेत. यात 50 HD चॅनेलही असणार आहेत. ही सेवा आपल्याला सात दिवसांच्या कॅच अप ऑप्शनसोबत मिळणार आहे.