नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे बजेट सादर करताना भाडेवाढीची घोषणा न करता सर्वसामान्यांना एक दिलासा दिलाय. दरवाढ न करता उत्पन्न वाढण्यावर भर दिला जाईल असे रेल्वेमंत्र्यांनी बजेटमध्ये सांगितले.
यावेळी त्यांनी बेरोजजागांसाठी चांगली बातमीही दिली. येत्या काही वर्षात रेल्वेतील सर्व पदांवरील भर्ती ऑनलाईन केली जाणार असल्याची घोषणा प्रभूंनी अर्थसंकल्पीय भाषणात केली.
रेल्वे भर्तीत केवळ ऑनलाईन रिक्रुटमेंट होणार. सर्व भर्तींसाठी एक नवी वेबसाईट बनवण्यात येणार. तसेच भर्तीमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही प्रभू यावेळी म्हणाले. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही नव्या नोकरी दिल्या जातील.