ऑर्कूट घेणार इंटरनेटच्या जगाचा निरोप

फेसबुक येण्याआधी तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारे ऑर्कूट 30 सप्टेंबर 2014 रोजी इंटरनेटच्या जगाचा निरोप घेणार आहे. 10 वर्षांपूर्वी 2004 साली सुरू झालेल्या या साईटने ब्राझील आणि भारतात चांगली पकड घेतली होती, परंतु अन्य देशांमध्ये ऑर्कूट तेवढे लोकप्रिय होऊ शकले नव्हते.

Updated: Sep 30, 2014, 07:49 AM IST
ऑर्कूट घेणार इंटरनेटच्या जगाचा निरोप title=

नवी दिल्ली : फेसबुक येण्याआधी तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असणारे ऑर्कूट 30 सप्टेंबर 2014 रोजी इंटरनेटच्या जगाचा निरोप घेणार आहे. 10 वर्षांपूर्वी 2004 साली सुरू झालेल्या या साईटने ब्राझील आणि भारतात चांगली पकड घेतली होती, परंतु अन्य देशांमध्ये ऑर्कूट तेवढे लोकप्रिय होऊ शकले नव्हते.

ऑर्कूट किंवा ऑर्कट (रोमन लिपी: Orkut) हे गूगल समूहाचे सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळाची रचना मुख्यत्वे करून नवीन मित्र बनविणे तसेच जुन्या मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी केली आहे. ऑर्कूट बुयुक्कोकटेन नावाच्या गूगल कर्माचा-याने ऑर्कूटची रचना केली आहे. ताच्याच नावावरून ऑर्कूट हे नाव संकेतस्थळाला दिले आहे.

ऑर्कुट प्रामुख्याने भारत आणि ब्राझील या दोन देशांत लोकप्रिय आहे. सध्या ऑर्कूटचा वापर जगभरात दहा कोटीहून अधिक लोक करत आहेत. सोशल नेटवर्किंग क्षेत्रातील पहिले नाव, ज्यावर लोकांनी आपले अकौंट बनविले आणि अनेक मित्रांशी जोडले गेले असे ऑर्कूट आजपासूनबंद होणार आहे. फेसबुक, लिंक्डइन सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्स या ऑर्कूटनंतर लोकांमध्ये आल्या. परंतु यांच्या आगमनामुळे ऑर्कूटची लोकप्रियता मात्र खूपच कमी झाली. त्याच बरोबर हे ही तेवढेच खरे आहे की या क्षेत्रात लोकांचा प्रवेश ऑर्कूटमुळेच झाला.

ज्यावर्षी ऑर्कूट सुरू झाले होते त्याच वर्षी फेसबुकदेखील सुरू झाले होते. मागील 10 वर्षात युटय़ुब, ब्लॉगर आणि गुगल प्लसने जगाच्या प्रत्येक कोपऱयात जागा बनविली आहे आणि याच दरम्यान ऑर्कूटचा वापर हळूहळू कमी होत गेला. यामुळे कंपनीने ऑर्कूटला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्याचे गुगलने म्हटले आहे.

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार गुगल ऑर्कूट बंद करण्याआधी युजर्सचा डाटा आर्काइव्हमध्ये टाकणार आहे. जर कोणाचे ऑर्कूटवर अकौंट आहे आणि कोणतीही माहिती गुगलने त्याच्याकडे सेव्ह करू, नये असे वाटत असल्यास हे खाते डीलिट करावे लागणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.