केवळ ९९ रुपयांत स्मार्टफोन, बुकींग सुरु

सध्या स्मार्टफोनची चलती आहे. अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनमध्ये नवनवीन सुविधा देत असतात. तर वाढती स्पर्धा लक्षात घेता किमतीतही चढाओढ दिसते. अनेक कंपन्यांनी मोबाईलच्या किंमती कमी केल्यात. आता तर चक्क ९९ रुपयांत स्मार्टफोन देण्याची घोषणा झालेय. या स्मार्टफोनचे बुकींग कालपासून सुरु झालेय.

Updated: May 18, 2016, 05:42 PM IST
केवळ ९९ रुपयांत स्मार्टफोन, बुकींग सुरु title=

बंगळुरु : सध्या स्मार्टफोनची चलती आहे. अनेक कंपन्या आपल्या स्मार्टफोनमध्ये नवनवीन सुविधा देत असतात. तर वाढती स्पर्धा लक्षात घेता किमतीतही चढाओढ दिसते. अनेक कंपन्यांनी मोबाईलच्या किंमती कमी केल्यात. आता तर चक्क ९९ रुपयांत स्मार्टफोन देण्याची घोषणा झालेय. या स्मार्टफोनचे बुकींग कालपासून सुरु झालेय.

पाहा काय नाव आहे?

देशात इंडिया वन या नावाने रिंगिंग बेल्सने एका स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणला आणि ऑनलाईन बुकींग केले होते. मात्र, त्याचे पुढे काय झाले हे सर्वांनाच माहीत आहे. आता बंगळुरुमधील 'नमोटेल' ही कंपनी ९९ रुपयांत स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणत आहे. या स्मार्टफोनला 'नमोटेल अच्छे दिन' असे नाव देण्यात आले आहे. 

वेबसाईटचं काय?

१७ मे ते २५ मे पर्यंत या स्मार्टफोनचे बुकींग करता येणार आहे. कंपनीची वेबसाईट namotel.com वरुन हा फोन बुक करता येणार असल्याची माहिती कंपनीचे प्रमोटर माधव रेड्डी यांनी दिलेय. मात्र, ही वेबसाईट ओपन होताना दिसत नाही आहे. This site can’t be reached असा मेसेज दिसतोय.

रजिस्ट्रेशनसाठी १९९ रुपये मोजावे लागणार!

हा स्मार्टफोन घेण्यासाठी जादा असा पद्धतीने पैसे मोजावे लागणार आहेत. ज्यांना हा स्मार्टफोन विकत घ्यायचा आहे त्यांना bemybanker.com वेबसाईटवर नाव नोंदवून युझर आयडी आणि पासवर्ड घ्यावा लागणार आहे. त्यानंतरच namotel.com वेबसाईटवरुन फोन बुक करता येणार आहे. bemybanker.com वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी १९९ रुपयांची लाईफटाईम मेम्बरशिप फी भरावी लागणार आहे.

आधार कार्ड बंधनकारक 

नमोटेलने केलेल्या दाव्याप्रमाणे २९९९ वरुन ही किंमत ९९ वर आणण्यात आली आहे. कॅश ऑन डिलिव्हरीवर हा फोन मिळणार आहे. हा फोन 'मेक इन इंडिया' अभियानासाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी कंपनीचा दावा आहे. तो मर्यादित काळावधीसाठी आहे. हा फोन विकत घेणाऱ्यांसाठी आधार कार्ड असणं बंधनकारक असणार आहे.