व्हॉट्स अॅप आणि गूगलचा करार, गूगल ड्राइव्हवर आता घेऊ शकता बॅकअप

जगातील सर्वात प्रसिद्ध मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपनं गूगलसोबत कंटेट बॅकअपसाठी करार केलाय. या अंतर्गत व्हॉट्स अॅपचा सर्व कंटेट जसं चॅट, व्हिडिओ आणि फोटोचं बॅकअप गूगल ड्राइव्हवर घेता येणार आहे. एवढंच नव्हे तर जुने चॅट्स सुद्धा गूगल ड्राइव्हवरून रिस्टोर केलं जावू शकेल.

Updated: Oct 8, 2015, 12:43 PM IST
व्हॉट्स अॅप आणि गूगलचा करार, गूगल ड्राइव्हवर आता घेऊ शकता बॅकअप title=

मुंबई: जगातील सर्वात प्रसिद्ध मॅसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपनं गूगलसोबत कंटेट बॅकअपसाठी करार केलाय. या अंतर्गत व्हॉट्स अॅपचा सर्व कंटेट जसं चॅट, व्हिडिओ आणि फोटोचं बॅकअप गूगल ड्राइव्हवर घेता येणार आहे. एवढंच नव्हे तर जुने चॅट्स सुद्धा गूगल ड्राइव्हवरून रिस्टोर केलं जावू शकेल.

आणखी वाचा - व्हॉटसअपची आयफोन यूझर्सना 'स्टोरेज युसेज'ची गूड न्यूज!

गूगल नुसार, हे नवं फीचर गुरूवार म्हणजे आजपासून सुरू होणार आहे. मात्र सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी जवळपास एक महिना लागेल. कंपनीनुसार, या फीचरमध्ये व्हॉट्स अॅप यूजरचं चॅट, व्हॉइस क्लिप, फोटो आणि व्हिडिओ ऑटोमॅटिकली त्याचा गूगल ड्राइव्हमध्ये बॅकअपच्या रुपात सेव्ह होईल.

या फीचरची आणखी एक खास बाब म्हणजे आपण आपल्या नव्या फोनवर सुद्धा जुन्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्स अॅप कंटेट अवघ्या काही क्लिकवर रिस्टोर करू शकाल.

व्हॉट्स अॅपचे को-फाउंडर ब्रायन यांनी सांगितलं की, व्हॉट्स अॅप बॅकअपसाठी गूगल ड्राइव्ह सर्वात सोपी ऑप्शन आहे. या सर्व्हिसमुळे लोकांना व्हॉट्सअॅप बॅकअप घेण्यासोबतच गूगल ड्राइव्हमुळे प्युअर अँड्रॉइडचा अनुभव घेता येईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.