२४ तासांत नोकिया ६ साठी २५०,००० रजिस्ट्रेशन

एचएमडी ग्लोबल कंपनीने गेल्या आठवड्यात नोकियाचा पहिला अँड्रॉईड स्मार्टफोन नोकिया ६ लाँच केला होता. या स्मार्टफोनची पहिली विक्री चीनमध्ये १९ जानेवारीला JD.comवर होणार आहे. या नोकियाच्या नव्या स्मार्टफोनसाठी २४ तासांत तब्बल २५०,००० रजिस्ट्रेशन मिळालेत. 

Updated: Jan 14, 2017, 10:28 AM IST
२४ तासांत नोकिया ६ साठी २५०,००० रजिस्ट्रेशन title=

नवी दिल्ली : एचएमडी ग्लोबल कंपनीने गेल्या आठवड्यात नोकियाचा पहिला अँड्रॉईड स्मार्टफोन नोकिया ६ लाँच केला होता. या स्मार्टफोनची पहिली विक्री चीनमध्ये १९ जानेवारीला JD.comवर होणार आहे. या नोकियाच्या नव्या स्मार्टफोनसाठी २४ तासांत तब्बल २५०,००० रजिस्ट्रेशन मिळालेत. 

PlayfulDroid च्या रिपोर्टनुसार मिडय रेंज स्मार्टफोन असलेल्या नोकिया ६ ला मिळालेला हा प्रतिसाद पाहता नोकिया स्मार्टफोन मार्केटमध्ये झोकात पुनरागमन करत असल्याचे दिसतेय. 

नोकियाचा हा पहिला अँड्रॉईड स्मार्टफोन अँड्रॉईड ७.० नॉगटवर चालतो. यात ५.५ इंचाचा डिस्प्ले आहे. तसेत २.५ डी गोरिला ग्लास प्रोटेक्शनही आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३० चिपसेट तसेच ४ जीबी रॅम आहे. ६४ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून ती १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो. यात १६ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा आहे तर ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. 

सध्या हा स्मार्टफोन चीनच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी उतरवण्यात आलाय. याची किंमत साधारण १६९९ युआन(साधारण १६,७५० रुपये) आहे. लवकरच हा स्मार्टफोन भारतात उपलब्ध होईल अशी आशा आहे.