मुंबई : तुमच्या पैकी ९० टक्के लोकांचा पहिला फोन नोकियाचं असेल, म्हणजे मोबाईलमधलं तुमचं पहिलं प्रेम हा नोकिया मोबाईल फोनच आहे, आणि तुमचं पहिलं प्रेम पुन्हा परत येणार आहे, ते नोकिया मोबाईल फोनच्या रूपाने.
तुम्हाला या फोनसोबत पुन्हा भुतकाळातील आठवणी जागवतील, आणि काही आठवणी आनंद देतील, तर काही नक्कीच सतावतील. कारण या फोनने तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळातील रूसवे-फुगवे आनंद दु:ख खूपच जवळून पाहिले आहेत, ऐकले आहेत.
हा अनेकांचा प्रिय फोन आहे, या फोनशी तुम्ही कसंही वागा, दूर फेका, तो जवळ येतो आणि तो 'ब्रेकअप' होत नाही, हे देखील तितकेच महत्वाचे आहे, कारण हे तुमच्या फोनशी असलेलं जुनं नातं आहे, सध्याची नाती ब्रेकअप आणि पॅचअपची आहेत. फोनही तसेच आहेत वर्षभरात बदलावे लागतात, मात्र हा फोन कधी ब्रेक झाल्याचं, तुटल्याचं फुटल्याचं तुम्ही ऐकलंच नसेल, एवढं मजबूत नातं हा फोनने निर्माण केलं होतं.
मात्र नोकियाचा हा फोन अनेकांना हवा आहे, तो पुन्हा मार्केटमध्ये नोकियाला नाव मिळवून देईल असा विश्वास कंपनीला आहे, म्हणून नोकियाचा 3310 पुन्हा बाजारात येतोय, तो ४ हजार २०० रूपयांना, नोकियाला पुन्हा आपला मित्र बनवा आणि भविष्याच्या आठवणी जागवा.
पहिला स्नेक गेम जो प्रचंड लोकप्रिय आहे, तो देखील हा नोकिया 3310 घेऊन आला होता, तेव्हा वाट पाहा नोकियाच्या 3310 च्या आगमनाची.