मुंबई : गूगलचे माजी कार्यकारी अधिकारी, मूळ भारतीय असलेले निकेश अरोडा यांना सॉफ्टबँक कॉर्पने प्रेसिडेंट म्हणून नियुक्त केलं आहे. सॉफ्टबँक टेलिकम्युनिकेशन ही कंपनी जपानची आहे.
कंपनीने निकेश यांना सप्टेंबर 2014 आणि मार्च 2015 साठी 850.5 कोटी रूपये दिले आहेत. या हिशेबानुसार निकेश यांचा एका महिन्याचा पगार 20 कोटी रूपये असणार आहे. निकेश यांचा पगार दिवसाला 4 कोटी रूपयांच्या जवळपास आहे.
गूगल चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून काम निकेश यांनी पाहिलं आहे, निकेश आता 47 वर्षांचे आहेत. शुक्रवारी शेअर होल्डर्सची जनरल मिटिंग होती, यात निकेश यांना कंपनीचे प्रेसिडेंट आणि चीफ ऑपरेशन ऑफिसर म्हणून नियुक्त करण्यात आलं. 2012 साली निकेश गूगलमधून सर्वात जास्त पगार घेणारे अधिकारी होते.
निकेशने मागील सप्टेंबर महिन्यांत सॉफ्टबँक कॉर्प ज्वाईन केलं होतं. जगातील रिवाजानुसार थोड्याशा वेगळ्या असलेल्या जपानामध्ये काही निवडक अधिकारी आहेत, ज्याचा पगार अरबो डॉलर्समध्ये आहे. पहिल्यांदाच जापानी कंपनीतील एखाद्या अधिकाऱ्यास 16 अब्ज येन, एवढा वार्षिक पगार
निकेश यांना एवढा मोठा पगार मिळण्याचं मुख्य कारण आहे, सॉफ्टबँकेची वर्षभराच्या आत, कमी वेळेत 10 हजार 700 कोटी रूपयांचा डील झाली. यात भारतीय ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडील आणि ओला कॅब्सनेही गुंतवणूक केली आहे.
निकेश अरोडा यांनी आयआयटी बीएचयूमधून ग्रॅज्युएशन केल्यानंतर बॉस्टन कॉलेजमधून अर्थशास्त्राची डिग्री आणि नॉर्थ ईस्टर्न युनिवर्सिटीतून एमबीएची डिग्री घेतली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.