चुकून मेल पाठवलाय... घाबरु नका, 'UNDO' करा!

कधीतरी आपल्याकडून चुकून एखादा मेल पाठवला जातो आणि उगीच मनस्तापाला सामोरं जावं लागतं... पण आता असं होणार नाही. कारण गुगलने आता एक अशी सुविधा देऊ केलीय ज्यामुळे पाठवलेला मेलही 'अन्डू' (undo) करता येणार आहे. 

Updated: Jun 24, 2015, 03:10 PM IST
चुकून मेल पाठवलाय... घाबरु नका, 'UNDO' करा! title=

मुंबई : कधीतरी आपल्याकडून चुकून एखादा मेल पाठवला जातो आणि उगीच मनस्तापाला सामोरं जावं लागतं... पण आता असं होणार नाही. कारण गुगलने आता एक अशी सुविधा देऊ केलीय ज्यामुळे पाठवलेला मेलही 'अन्डू' (undo) करता येणार आहे. 

गूगलने नुकतीच ही सुविधा 'जीमेल'वर सुरू केलीय ज्यामुळे आपण पाठवलेला मेल परत माघारी घेऊ शकतो. पण, या सुविधेचा वापर करायची संधी तुम्हाला मेल पाठवल्यानंतर केवळ ३० सेकंदासाठीच मिळू शकणार आहे. ही वेळ बदलण्याचा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे... ही वेळ बदलून तुम्ही १० किंवा २० सेकंद करू शकता. 

गूगलने हे टूल सहा वर्षांपूर्वीच तयार केलं होतं. पण, आत्तापर्यंत ते गूगल लॅबमध्येच ठेवण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी गूगलने हे फीचर आपल्या जीमेल अॅपवर दिलं. आता हे फीचर डेस्कटॉप यूजर्ससाठीही उपलब्ध झालंय.

आपण पाठवलेला मेल undo केल्यावर आपल्याला स्क्रीनवर तसा संदेश दिसेल.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.