तुमच्या फेसबुकवर नव्या 'स्पॅम'चा हल्ला

फेसबुकवर दिसणाऱ्या एका नव्या 'स्पॅम'नं अनेक युझर्सच्या अडचणी वाढवल्यात. त्यामुलेच, तुमच्या एखाद्या मित्राचा एखादा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मॅसेज मिळाला असेल तर ती लिंक ओपन करू नका... 

Updated: Jul 28, 2014, 03:47 PM IST
तुमच्या फेसबुकवर नव्या 'स्पॅम'चा हल्ला title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : फेसबुकवर दिसणाऱ्या एका नव्या 'स्पॅम'नं अनेक युझर्सच्या अडचणी वाढवल्यात. त्यामुलेच, तुमच्या एखाद्या मित्राचा एखादा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला मॅसेज मिळाला असेल तर ती लिंक ओपन करू नका... 

कारण, आत्तापर्यंत एक-दुसऱ्यांच्या टाईमलाईनवर आपोआप पोस्ट होणारे स्पॅम मॅसेजेस येताना दिसत आहेत. पण, आता मात्र इनबॉक्सद्वारे असे स्पॅम मॅसेज येताना दिसत आहेत. 

यामुळे, कोणत्याही फ्रेंडच्या फेसबुक अकाऊंटवरून तुमच्या मॅसेज बॉक्समध्ये एका व्हिडिओची लिंक येईल. या लिंकवर तुमचाच फेसबुक प्रोफाईल फोटो, तुमचं नाव आणि पुढे यू ट्युब व्हिडिओ असं लिहिलेलं असेल. पुढे एक लिंक असेल. यावर 7.hidemyass.com आणि प्रायव्हेट व्हिडिओ असं लिहिलेलं असंल. पण, यावर अजिबात क्लिक करू नका. 
 
काय आहे हा स्पॅम
हा स्पॅम व्हिडिओवर तुम्ही क्लिक केल्यास तुम्ही एका प्रॉक्सी सर्व्हरवर प्रवेश करता आणि तुमचा आयपी अॅड्रेस बदलून जातो. त्यामुळे इंटरनेटवर तुमची ओळख लपविली जाते.  

हा सर्व्हरमुळे तुमचा आयपी अॅड्रेस आपोआप बदलून जाईल. ज्यामुळे, टेक्निकली तुम्ही इंटरनेटच्या जगातून काही वेळ अदृश्य व्हाल. म्हणजेच, यानंतर तुम्ही कोणत्याही साईटवर जाल तरी तुमचा आयपी अॅड्रेस समजणार नाही. 

चुकून लिंक क्लिक झाल्यास... 
तुम्ही ही लिंक क्लिक करताच तुमचा आयपी अॅड्रेस बदलून जाईल. पण, घाबरण्याची गरज नाही. लगेचच तुमच्या सगळ्या विंडो क्लोज करून तुमचा ब्राऊजर बंद करा. जेव्हा पुन्हा तुम्ही हा ब्राऊजर उघडाल तेव्हा तुमचा ओरिजिनल आयपी अॅक्टिव्ह होईल. 

सायबर क्राईममध्ये अशा प्रॉक्सी सर्व्हरचा वापर होतो. याचा वापर हॅकिंग आणि बॅन साईटस पाहण्यासाठी केला जातो. यामुळे, तुमचा सिस्टम हॅक होण्याचा धोका असतो

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.