मोटोरोलाने लॉन्च केला बजेट स्मार्टफोन मोटो E 2nd जनरेशन

 स्मार्टफोन कंपन्यांमध्ये आपला दबाब निर्माण करू पाहणाऱ्या मोटोरोला कंपनीने आपला नवीन लो रेंजचा स्मार्टफोन मोटो E सेकंड जनरेशन आज भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत केवळ ६९९९ आहे. 

Updated: Mar 10, 2015, 07:14 PM IST
मोटोरोलाने लॉन्च केला बजेट स्मार्टफोन मोटो E 2nd जनरेशन title=

मुंबई :  स्मार्टफोन कंपन्यांमध्ये आपला दबाब निर्माण करू पाहणाऱ्या मोटोरोला कंपनीने आपला नवीन लो रेंजचा स्मार्टफोन मोटो E सेकंड जनरेशन आज भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत केवळ ६९९९ आहे. 

मोटोरोलाच्या इतर स्मार्टफोन प्रमाण याची विक्रीही एक्सक्ल्युझिव्ह फ्लिपकार्टवर होणार आहे. मोटो E कमी किंमतीचा अत्यंत चांगल्या फिचर्सचा स्मार्टफोन आहे. हा युजर्सच्या मागणीनुसार बनविण्यात आला आहे. 

दोन दिवसांपूर्वी कंपनीने आपला हायरेंज स्मार्टफोन मोटो टर्बो लॉन्च केला होता. आता लेनोवो A6000, श्याओमी रेडमी नोट 4G आणि मायक्रोमॅक्स यू युरेकाला टक्कर देण्यासाठी हा फोन मोटोरोलाने बाजारात आणला आहे. 

का खास आहे मोटो E सेकंड जनरेशनमध्ये 
डिस्प्ले: 4.5 इंचाच 540x960 पिक्सल रेज़ोल्यूशनची स्क्रिन आहे. 
या शिवाय याला गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. 
ऑपरेटिंग सिस्टम: 5.0 लॉलीपॉप
प्रोसेसर: 1.2 GHZ स्नैपड्रैगन 410 क्वाडकोर
रॅम: 1GB
स्टोरेज़: 8GB इंटरनल स्टोरोज़ आणि 32GB तक एक्सपेंशन
कॅमरा: 0.3 मेगापिक्सल वीजीए फ्रंट कॅमरा आणि 5 मेगापिक्सल रीयर कॅमरा
बॅटरी:  2390mAh

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.