टेक्सास : अमेरिकेच्या टेक्सास शहरमधील मोहमद अहमद एका दिवसात जगभरात चर्चेत आला आहे. मोहमद अहमदला पोलिसांनी अटक केली होती, कारण त्याने आपल्या शाळेच्या एका प्रोजेक्टसाठी डिजिटल घड्याळ बनवली.
14 वर्षाच्या मुलाला बेड्या ठोकल्या
जेव्हा मोहमद अहमद ही घड्याळ घेऊन शाळेत गेला तेव्हा शिक्षकांनी ही घड्याळ म्हणजे बॉम्ब असावा, असं समजून पोलिसांना बोलावून घेतलं, पोलिसांनीही घाईघाईत 14 वर्षाच्या मुलाला बेड्या ठोकल्या आणि जेरबंद केलं.
अहमदला अटक, जगभरात चर्चा
सोशल मीडियातील न्यूज साईट्सवर या बातम्या प्रकाशित झाल्या. यामुळे अहमदने घड्याळ बनवली आणि त्याला बॉम्ब बनवण्याच्या आरोपाखाली अटक केल्याची बातमी जगभर पसरली. यानंतर ट्वीटर आणि फेसबुकवर अहमदच्या समर्थनात पोस्ट येऊ लागल्या, #IStandWithAhmed ट्रेंड ट्वीटरवर ट्रेंड करतोय.
झकरबर्ग, बराक ओबामाचं अहमदला आमंत्रण
यानंतर फेसबुकचा फाऊंडर मार्क झकरबर्गने फेसबुक स्टेटस अपडेट केलं आणि अहमदला शाबासकी देत फेसबुक अकाऊंट ज्वाईंट करण्याचं आमंत्रण दिलं. तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अहमदला व्हाईट हाऊसला येण्याचं आमंत्रण दिलं, आम्हाला अहमदसारख्या मुलांकडून विज्ञानात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असं बराक ओबामा यांनी म्हटलंय.
गूगलने अहमदला बोलावलं
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलेरी क्लिंटन यांनी ट्वीटरवर अहमदला शाबासी दिली. तर गुगलने अहमदला गूगल सायन्स फेअरसाठी त्याने बनवलेल्या डिजिटल घड्याळसह बोलावलं आहे.
शाळेला चूक उमगली
अहमदला अटकेनंतर टेक्सास पोलिसांनी विरोध वाढत होता, त्यामुळे त्यांनी अहमदला सोडून दिलं. यानंतर शाळेलाही आपली चूक उमगली त्यांनी अहमदच्या घरी माफीनामा पाठवला आहे.
अहमदला वाटलं होतं की, आपलं शाळेत कौतुक होईल, पण त्याच्या डिजिटल घड्याळला बॉम्ब समजण्यात आल्याने तो नाराज झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.