मोदींमुळे वाढला खादीचा नवा ट्रेन्ड..

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सुरुवातीलाच केलेल्या भाषणांत नरेंद्र मोदी यांनी केलेला खादीच्या वापराबाबतचा आग्रह तरुणांना चांगलाच भावला.  खादी किंवा हातमागावरच्या कापडांकडे बघून नाक मुरडणाऱ्या तरुणाईचा कल आता 'मोदी स्टाइल' खादी कुर्ते आणि जाकिटांच्या वापराकडे वाढला आहे, तर तरुणींमध्येही खादीच्या सलवार-कुर्त्यांना पसंती मिळत आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत खादीच्या कापडाची मागणी यंदा २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे.

Updated: Nov 25, 2014, 09:35 PM IST
मोदींमुळे वाढला खादीचा नवा ट्रेन्ड.. title=

मुंबई : पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सुरुवातीलाच केलेल्या भाषणांत नरेंद्र मोदी यांनी केलेला खादीच्या वापराबाबतचा आग्रह तरुणांना चांगलाच भावला.  खादी किंवा हातमागावरच्या कापडांकडे बघून नाक मुरडणाऱ्या तरुणाईचा कल आता 'मोदी स्टाइल' खादी कुर्ते आणि जाकिटांच्या वापराकडे वाढला आहे, तर तरुणींमध्येही खादीच्या सलवार-कुर्त्यांना पसंती मिळत आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत खादीच्या कापडाची मागणी यंदा २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे.
मोदी यांच्या वैशिष्टय़पूर्ण कुर्त्यांनी आणि जाकिटांनी खादीला 'स्टाइल स्टेटमेंट' मिळवून दिले. यामुळे खादीची फॅशनच आली. कॉलेज कट्टय़ांपासून लग्न समारंभापर्यंत ठिकठिकाणी हातमागावरच्या कापडापासून तयार झालेल्या पेहरावाचा 'ट्रेन्ड' दिसून येत आहे. अर्थात हातमागावरच्या कपडय़ांना आणि त्यांच्या कारागिरांनाही त्यामुळे सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. 

मुलांमध्ये जॅकेट्स 'इन'
मोदींनी वापरलेली उजळ रंगाच्या जाकिटांची शैली तरुणाईमध्ये लोकप्रिय झाली. गेल्या दोन दशकांपासून दुर्लक्षित राहिलेल्या जाकिटांची फॅशन पुन्हा आली आहे, असे डिझायनर प्रणोय कपूर यांनी सांगितले. त्यातही काळा, राखाडी, गडद निळा या रंगांऐवजी उजळ रंगांच्या जाकिटांना अधिक पसंती आहे. ५०० ते थेट ५,००० रुपयांपर्यंत या जाकिटांची किंमत आहे.

खादी, कॉटनचे कुर्ते, सलवार कमीझ, शर्ट तरुणाईमध्ये लोकप्रिय होऊ लागले आहेत. दरवर्षी खादी कापडाची मागणी ५ ते १० टक्क्यांनी वाढते. ही वाढ यंदा २०-३० टक्क्यांवर गेली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.