आता, एका कॉलसाठी लागणार केवळ १० पैसे प्रति मिनिट!

तुम्ही देशभरात कुठेही आणि कधीही फोन केला तरी तुम्हाला प्रति मिनिट केवळ १० पैसे मोबाईल चार्जेस लागले तर... होय, हे शक्य केलंय देशातल्या एका मोठ्या टेलिकॉम कंपनी 'एअरसेल'नं...  

Updated: Jan 23, 2015, 01:05 PM IST
आता, एका कॉलसाठी लागणार केवळ १० पैसे प्रति मिनिट! title=

नवी दिल्ली : तुम्ही देशभरात कुठेही आणि कधीही फोन केला तरी तुम्हाला प्रति मिनिट केवळ १० पैसे मोबाईल चार्जेस लागले तर... होय, हे शक्य केलंय देशातल्या एका मोठ्या टेलिकॉम कंपनी 'एअरसेल'नं...  

आज लोकांचा दिवसातला बहुतांशी काळ फोनवरच जातो... आपल्या कुटुंबापासून दूर राहणारे आपल्या आपल्या मित्र-मैत्रिणींशी तासनतास फोनवर गप्पा मारणाऱ्यांची कमी नाही. पण, ही बातमी ऐकल्यानंतर अशा व्यक्तींना नक्कीच दिलासा मिळणार आहे. 

'एअरसेल'नं नुकतीच एक नवी सेवा देशात सुरू केलीय. याद्वारे केवळ १० पैसे प्रती मिनिट चार्जेस ग्राहकांना द्यावे लागतील. कंपनीनं या 'युनायटेड इंडिया @१० पैसे' असं नाव दिलंय. 

कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार, हा आत्तापर्यंतचा सर्वांत स्वस्त कॉल रेट आहे. १० पैसे प्रति मिनिट कॉल रेटची ऑफर ग्राहकांसाठी ३० दिवसांपर्यंत असीमित म्युझिक पॅकही मिळणार आहे. 

दिल्लीमध्ये ग्राहकांसाठी विशेष कोम्बो पॅक ७१ रुपयांपासून १४९ रुपयांपर्यंत आहे. ही ऑफर ३० दिवसांसाठी वैध राहील. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.