'ब्लॅकबेरी'ला कोण टेकओव्हर करणार? मायक्रोसॉफ्ट की शाओमी?

मोबाईल उत्पादक कंपनी 'ब्लॅकबेरी'ला टेकओव्हर करण्याच्या बातम्या पुन्हा एकदा टेक मीडियामध्ये येत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर आणि फेब्रुवारी २०१५ मध्ये कंपनी नफ्यात असूनदेखील ही कंपनी विकली जाणार, अशा आशयाच्या बातम्या दिसत आहेत.  

Updated: May 23, 2015, 05:09 PM IST
'ब्लॅकबेरी'ला कोण टेकओव्हर करणार? मायक्रोसॉफ्ट की शाओमी? title=

मुंबई : मोबाईल उत्पादक कंपनी 'ब्लॅकबेरी'ला टेकओव्हर करण्याच्या बातम्या पुन्हा एकदा टेक मीडियामध्ये येत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर आणि फेब्रुवारी २०१५ मध्ये कंपनी नफ्यात असूनदेखील ही कंपनी विकली जाणार, अशा आशयाच्या बातम्या दिसत आहेत.  

'डिजीटाईम्स'च्या रिपोर्टनुसार, 'ब्लॅकबेरी'ला टेकओव्हर करणाऱ्या कंपन्यामध्ये काही कंपन्यांची नावे समोर येत आहेत. या यादीत सर्वांत वर आहे मायक्रोसॉफ्ट, श्याओमी, लिनोवो, हुवेई अशा अनेक चीनी कंपन्यांचा समावेश आहे. 

मायक्रोसॉफ्ट 'ब्लॅकबेरी'ला खरेदी करण्यास उत्सुक आहे. कारण 'ब्लॅकबेरी' सध्या हार्डवेअरऐवजी सॉफ्टवेअरवर आपलं लक्ष केंद्रीत करत आहे. त्यामुळे हा व्यवहार मायक्रोसॉफ्टसाठी फायद्याचा ठरू शकतो. 

शाओमीसारख्या चीनी कंपन्याही 'ब्लॅकबेरी'ला खरेदी करण्यास उत्सुक आहेत. मात्र, पेटंट राईटबाबत काही अडचणी उद्भवू शकतात, असा अंदाज आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.