मायक्रोसॉफ्ट देणार ग्राहकांना एमएस ऑफिस मोफत

मायक्रोसॉफ्टने आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिली आहे.  मायक्रोसॉफ्टने ग्राहकांना एमएस ऑफिस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने घोषणा केली आहे की, मोबाइल, टॅबलेट, छोट्या स्क्रिनच्या संगनकासाठी एमएस ऑफिस मोफत देण्यात येणार आहे. 

Updated: Mar 28, 2015, 05:14 PM IST
 मायक्रोसॉफ्ट देणार ग्राहकांना एमएस ऑफिस मोफत  title=

मुंबई : मायक्रोसॉफ्टने आपल्या ग्राहकांना एक खुशखबर दिली आहे.  मायक्रोसॉफ्टने ग्राहकांना एमएस ऑफिस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने घोषणा केली आहे की, मोबाइल, टॅबलेट, छोट्या स्क्रिनच्या संगनकासाठी एमएस ऑफिस मोफत देण्यात येणार आहे. 

१० इंचपेक्षा लहाण उपकरणांसाठी  मायक्रोसॉफ्ट ऑफिस मोफत असेल, अशी माहिती मायक्रोसॉफ्टचे कॉर्पोरेट व्हाइस प्रेसिडंट कर्क कोनिसबॉअर यांनी  दिली.  १० इंचपेक्षा मोठ्या आकाराचे टॅबलेट प्रोफेशनल टॅबलेट नसतात. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट १०.१ इंच किंवा त्यापेक्षा कमी आकाराच्या उपकरणांना मोबाईल मानतो. त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या उपकरणांना मायक्रोसॉफ्ट ऑफिस मोफत मिळणार नसल्याचे मायक्रोसॉफ्टने स्पष्ट केले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.