मुंबई: स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सनं स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं भारतीय यूजर्ससाठी जबरदस्त ऑफर दिलीय. मायक्रोमॅक्सनं आपल्या कॅनव्हास सीरिजचे तीन स्मार्टफोनची किमत कमी केलीय. यात कॅनव्हास डूडल ४, कॅनव्हास जूस २ आणि कॅनव्हास फायर ४ मॉडेल आहे.
पहिले कॅनव्हास डूडल ४ची किंमत ९४९९ रुपये होती. ज्यात कंपनीनं ती कमी करून ७९९९ रुपये केलीय. कॅनव्हास जू २ची किंमत ८९९९ रुपये होती ती आता ७९९९ रुपये झालीय आणि या ऑफर अंतर्गत कॅनव्हास फायर ४ची जूनी किंमत ६९९९ रुपये होती, ती आता ६२९९ रुपये करण्यात आलीय.
कॅनव्हास डूडल ४ फीचर्स
- डिस्प्ले ६ इंच आहे ज्यावर कोर्निंग गोरिल्ला ग्लास ३चं प्रोटेक्शन दिलं गेलंय.
- सोबतच फोन ५.० लॉलीपॉप ओएसवर काम करतो.
- कॅनव्हास डूडल ४चं प्रोसेसर १.३ GHz क्वाड-कोर मीडियाटेक (MTK6582M) आहे.
- रॅम १ GB
- ८ मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
- इंटरनल मेमारी १६ जीबी असून ३२ जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डनं वाढवू शकाल.
कॅनव्हास जूस २चे फीचर्स
- डिस्प्ले ५ इंच, रिझॉल्यूशन ७२०X१२८० पिक्सेल आहे.
- प्रोसेसर क्वाड-कोर १.३GHz आहे.
- २ GB रॅम
- इंटर्नल मेमरी 8GB, मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं ३२ जीबीपर्यंत वाढवलं जावू शकतं.
- कॅनव्हास जूस २मध्ये ८ मेगापिक्सेल ऑटोफोकस रिअर कॅमेरा LED फ्लॅश सोबत दिला गेलाय. सोबतच २ मेगापिक्सेल फोकस फ्रंट कॅमेरा आहे.
कॅनव्हास फायर ४
- मायक्रोमॅक्सच्या नवीन कॅनव्हास फायर ४मध्ये ४.५ इंचची स्क्रीन दिली गेलीय. ज्याचं रिझॉल्यूशन ४८०X८५४ पिक्सेल आहे. फोनचा रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सेल आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.