सॅमसंगला मायक्रोमॅक्सने मागे टाकले, झाली नं.१ कंपनी

भारताच्या एकूण मोबाईल बाजारात मायक्रोमॅक्सने सॅमसंगला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉइंट रिसर्चनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत मायक्रोमॅक्सचा मार्केट शेअर १६.६ टक्के झाला आहे. तर सॅमसंगचा मार्केट शेअर १४.४ टक्के आहे. 

Updated: Aug 5, 2014, 04:37 PM IST
सॅमसंगला मायक्रोमॅक्सने मागे टाकले, झाली नं.१ कंपनी title=

मुंबई : भारताच्या एकूण मोबाईल बाजारात मायक्रोमॅक्सने सॅमसंगला मागे टाकत प्रथम क्रमांक पटकावला आहे. मार्केट रिसर्च फर्म काउंटरपॉइंट रिसर्चनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत मायक्रोमॅक्सचा मार्केट शेअर १६.६ टक्के झाला आहे. तर सॅमसंगचा मार्केट शेअर १४.४ टक्के आहे. 

फर्मने दिलेल्या रिपोर्टनुसार या दोघांनंतर मोबाईल बाजारात १०.९ टक्क्यांसह नोकिया तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. ९.५ टक्क्यांसह कार्बन चौथ्या आणि ५.६ टक्क्यांसह लावा पाचव्या स्थानावर आहे. 
३१ मार्चला संपलेल्या तिमाहीमध्ये सॅमसंग १६.३ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर होता. तर मायक्रोमॅक्स १३ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. 

एकूण मोबाइलचा बाजार २ टक्क्यांच्या दराने वाढतो. तर स्मार्टफोनचे मार्केट ८६ टक्क्यांनी वाढते. फिचर फोनच्या मागणीत घट आल्याने त्यांची विक्री १६ टक्क्यांनी घटली आहे.

केवळ स्मार्टफोनचा विचार केला तर सॅमसंग आजही २५.३ टक्क्यांसह आजही पहिल्या क्रमांकावर आहे. मायक्रोमॅक्स १९ टक्क्यांसह दुसऱ्या, ५.९ टक्क्यांसह कार्बन तिसऱ्या आणि ४.३ टक्क्यांसह मोटोरोला चौथ्या स्थानावर आहे.

मायक्रोमॅक्सबाबत काउंटरपाइटचे डिव्हाइसेज अँड इकोसिस्टिम्स रिसर्च डायरेक्टर नील शाह म्हणाले, ही अशी कंपनी आहे जिच्यावर मोबाइल इंडस्ट्रीची नजर असेल कारण ही कंपनी घरगुती बाजारातून आता बाहेर पडत आहे. 
त्यांनी सांगितले, मोटो X, मोटो G आणि मोटो E या आपल्या आकर्षक आणि छोट्या पोर्टफोलियो आणि चांगल्या रणनितीने मोटोरोलाने आश्चर्यकारक प्रदर्शन केले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.