शॉपिंगमध्ये महिलांपेक्षा पुरुषांनी मारली बाजी

ई-शॉपिंग आल्यापासून दुकानात जाऊन खरेदी करणे ही पद्धत मागेच पडली आहे. लोक गर्दीत जाऊन खरेदी करण्यापेक्षा इंटरनेटवर शॉपिंग करण्याकडे जास्त भर देत आहेत. 

Updated: Jul 14, 2015, 02:57 PM IST
शॉपिंगमध्ये महिलांपेक्षा पुरुषांनी मारली बाजी title=

मुंबई : ई-शॉपिंग आल्यापासून दुकानात जाऊन खरेदी करणे ही पद्धत मागेच पडली आहे. लोक गर्दीत जाऊन खरेदी करण्यापेक्षा इंटरनेटवर शॉपिंग करण्याकडे जास्त भर देत आहेत. 

बरीच दशके महिलांनी शॉपिंगवर अधिराज्य गाजवलेलं आहे. महिला आणि शॉपिंग हे समीकरणचं झाले आहे. 
बायकोबरोबर शॉपिंगला जाणे म्हणजे नवऱ्यांसाठी कंटाळवाणे काम. पण आता पुरुषदेखील महिलांच्या खांद्याला खांदा लावून आता ई-शॉपिंग करू लागले आहेत.
 भारतामध्ये ई-शॉपिंग करण्यात पुरुषांनी महिलांना मागे टाकले आहे असे एका पाहणीत आढळून आले आहे. महिलांपेक्षा 1.3 पट जास्त वेळ पुरुष  ई-शॉपिंगसाठी आपला वेळ घालवतात. 
 दहापैकी सहा पुरुष ई-शॉपिंग करतात असे टीसीएस या कंपनीने केलेल्या अभ्यासात समोर आले आहे. 
 ब्रिटन आणि अमेरिकेत मात्र महिलांचेचं शॉपिंगमध्ये वर्चस्व आहे. तेथील पुरुषांना ई-शॉपिंगमध्ये फारसा रस नाही. 
 भारतीय पुरुष टेक्नोसॅव्ही असल्यामुळे टेक्नॉलॉजीशी निगडित वस्तूंची खरेदी जास्त करतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.