मार्क झुकेरबर्गला फेसबुकसाठी मिळालं एक गोंडस 'लाईक'

 अवघ्या जगाला वेड लावणारं फेसबुक जन्माला घालणाऱ्या मार्क झुकरबर्गच्या घरी लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे.

Updated: Aug 1, 2015, 12:37 PM IST

 


मार्क आणि प्रिसलिला

कॅलिफोर्निया : अवघ्या जगाला वेड लावणारं फेसबुक जन्माला घालणाऱ्या मार्क झुकरबर्गच्या घरी लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे.

मार्क झुकरबर्ग सध्या सज्ज होतोय ती 'बाबांची' भूमिका निभावण्यासाठी...  मार्कने स्वतः फेसबुकवर आपल्या पत्नीसह एक फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिलीय.

मार्कला आपल्या घरी एक छोटीशी परी येणार असं वाटतंय. त्याची बायको प्रिसलिला डॉक्टर तसेच शिक्षणतज्ज्ञ आहे.

'हा आमच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय आहे. आधी आम्हाला जगातील लोकांच्या जीवनाला स्पर्श करण्याची संधी मिळाली... आता आमचं लक्ष आमच्या मुलाचे तसेच येणाऱ्या पिढीचे जीवन सुंदर बनवण्यासाठी आहे' असं मार्कनं म्हटलंय. 

'माझी पत्नी प्रिसलिला आणि होणारं बाळ दोघांचीही प्रकृती चांगली आहे. मी येणाऱ्या बाळाला बघण्यासाठी खूपच उत्सुक आहे. अल्ट्रासाऊंडमध्ये बाळानं आपला अंगठा उंचावून फेसबुकला 'लाईक' केल्याचं दिसतंय. त्यामुळे माझ्यानंतर हा सगळा कारभार तीच सांभाळू शकते असा माझा विश्वास आहे' असं हर्षोल्हासित मार्क झुकरबर्गनं आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटलंय.  

याआधी प्रिसलिला हिचे तीन मिसकॅरेज झाले होते पण यावेळी हा धोका दिसत नाही असेही मार्क याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.