सावधान ! कँडी क्रश खेळणं पडू शकतं तुम्हाला महागात

मोबाईलवर गेम खेळणे आज लोकांची सवय झाली आहे. पण ही सवय तुम्हाला धोकादायक ठरु शकते. अमेरिकेतील एका व्यक्तीला कँडी क्रश खेळण्याची अशी सवय लागली की त्याच्या अंगठा आता काम करत नाही आहे.

Updated: Aug 9, 2016, 11:03 AM IST
सावधान ! कँडी क्रश खेळणं पडू शकतं तुम्हाला महागात title=

मुंबई : मोबाईलवर गेम खेळणे आज लोकांची सवय झाली आहे. पण ही सवय तुम्हाला धोकादायक ठरु शकते. अमेरिकेतील एका व्यक्तीला कँडी क्रश खेळण्याची अशी सवय लागली की त्याच्या अंगठा आता काम करत नाही आहे.

हा व्यक्ती अनेक तास हा गेम खेळत असायचा. गेम खेळतांना अंगठ्याचा तो अधिक वापर करायचा. त्यामुळे अंगठ्याची एक उती तुटली. एका प्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये ही माहिती प्रकाशित झाली आहे. या व्यक्तिच्या बोटाची सर्जरी करावी लागली. डॉक्टरांचं म्हणणं आहे की गेम खेळल्यामुळे बोटांच्या मांसपेशींवर प्रेशर येतं आणि मग बोटांना संवेदना जाणवत नाही.

स्मार्टफोनवर गेम खेळणं हे एका डिजीटल पेन किलर सारखं आहे. दिवसात अर्धा तासा गेम खेळणं आरोग्यासाठी हानिकारक आहे. याची सवय लागणं अतिशय धोकादायक आहे. भारतातही लाखो लोकं या गेमचे दिवाने आहेत. किंग डिजीटल एंटरटेनमेंटद्वारे बनवल्या गेलेल्या कँडी क्रश हा गेम जगभरात प्रसिद्ध आहे. जवळपास दीड कोटी लोकांनी हा गेम डाऊनलोड केला आहे.