लाच घेणाऱ्यांनो सावधान! आता तुमचा फोटो फेसबुकवर!

लाच घेणाऱ्यांनो सावधान, आता जर तुम्ही भ्रष्टाचार करतांना सापडलात तर लगेच तुमची लाज सोशल मीडियावर निघेल. महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)नं एक नवं फेसबुक पेज सुरू करण्याचा विचार केलाय. या पेजवर लाच घेणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचे फोटो अपलोड केले जातील. 

Updated: Aug 17, 2014, 10:23 PM IST
लाच घेणाऱ्यांनो सावधान! आता तुमचा फोटो फेसबुकवर! title=

मुंबई: लाच घेणाऱ्यांनो सावधान, आता जर तुम्ही भ्रष्टाचार करतांना सापडलात तर लगेच तुमची लाज सोशल मीडियावर निघेल. महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरो (एसीबी)नं एक नवं फेसबुक पेज सुरू करण्याचा विचार केलाय. या पेजवर लाच घेणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचे फोटो अपलोड केले जातील. 

एसीबीचे डीजीपी प्रवीण दीक्षित यांनी सांगितलं की, “भ्रष्ट लोकांविरोधात आपली कारवाई मजबूत करण्यासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही फेसबुकचा वापर करण्याची योजना आखत आहोत.”
जर हे फेसबुक पेज सुरू झालं तर यावर आरोपींच्या फोटोसह त्यांनी किती लाच घेतली आणि त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला दस्ताऐवजही शेअर केला जाईल.  

अँटी करप्शन ब्युरोनं यावर्षी आतापर्यंत 744 गुन्हे नोंदवले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेनं हे 114 टक्के जास्त आहेत. एसीबी मागील दोन महिन्यांपासून आपल्या वेबसाईटवर लाचखोरांचे फोटो टाकत आहे. 

16 ऑगस्टपर्यंत 744 गुन्ह्यांमध्ये 1009 सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आलीय. गेल्या वर्षी यावेळेपर्यंत 452 लोकांना अटक झाली होती.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.