आयरिस 360... ड्युएल सिम, दोन स्पीकर्स, दोन कॅमेरे

'लावा मोबाईल्स'चा नवा हँडसेट आयरिस 360 लॉन्च झालाय. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हा नवा स्मार्टफोन पाहायला मिळतोय. 

Updated: Aug 16, 2014, 03:31 PM IST
आयरिस 360... ड्युएल सिम, दोन स्पीकर्स, दोन कॅमेरे title=

मुंबई : 'लावा मोबाईल्स'चा नवा हँडसेट आयरिस 360 लॉन्च झालाय. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हा नवा स्मार्टफोन पाहायला मिळतोय. 

स्वस्त आणि अधिक फिचर्ससहीत हा स्मार्टफोन इतर कंपन्यांसाठी आव्हान ठरू शकतो. ज्या ग्राहकांना म्युझिकची आवड आहे त्यांना हा स्मार्टफोन खूपच पसंत पडेल. कारण, या स्मार्टफोनमध्ये दोन स्पीकर देण्यात आलेत आणि दोन्ही स्मार्टफोनच्या पुढच्या बाजुला आहेत. 

आयरिस 360 हा एक ड्युएल सिम फोन आहे. एक गीगाहर्टज ड्युएल कोअर प्रोसेसरवरून चालतो. यामध्ये अँन्ड्रॉईड 4.2 (जेली बीन) ऑपरेटिंग सिस्टम आहे. फोनमध्ये 3.5 इंचाचा टीएफटी टच स्क्रीन दिलेला आहे. याचं रिझोल्युशन 480 X 320 पिक्सल आहे. 

या स्मार्टफोनमध्ये दोन कॅमेरेही दिले गेलेत. रिअरमध्ये 3.2 मेगापिक्सलचा फिक्स्ड फोकस आणि दुसरा फ्रंट कॅमेरा जो व्हिडिओ रेकॉर्डिंगही करू शकतो. यामध्ये, म्युझिक समोर लावलेल्या स्पीकर्समधून ऐकायला मिळतं. 

हा हँन्डसेट 11.2 मिमी जाडीचा आहे. यात 512 एमबीचा रॅम आहे. यामध्ये, 4 जीबी इंटरनल स्टोअरेज हे. तसंच 32 जीबी एक्स्टर्नल स्टोअरेज सपोर्ट आहे आणि 1.07 जीबी स्पेस अॅप्ससाठी आहे.  

थ्रीज, वाय-फाय, ब्लू टूथ असे फिचर्स यामध्ये देण्यात आलेत. या फोनमध्ये दोन सेन्सर आहेत. फोनची बॅटरी 1400 एमएएच आहे. त्यामुळे तुम्हाला थ्रीजी नेटवर्कवर 9 तासांचा टॉकटाईम मिळतो तर टू जीवर 10 तासांचा.. 

या स्मार्टफोनची किंमत आहे 5000 रुपयांच्या घरात असेल... लवकरच हा स्मार्टफोन दुकानांत विक्रिसाठी उपलब्ध होईल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.