एम-इंडिकेटरवर आता एसटी

रेल्वेची माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एम - इंडिकेटरवर आता एसटी गाड्यांची माहिती आणि वेळापत्रक मिळणार आहे.

Updated: Dec 31, 2014, 01:27 PM IST
एम-इंडिकेटरवर आता एसटी  title=

मुंबई : रेल्वेची माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एम - इंडिकेटरवर आता एसटी गाड्यांची माहिती आणि वेळापत्रक मिळणार आहे.

एम-इंडिकेटरवर आता एसटीची माहिती पाहता येणार आहे. मुंबईतील रेल्वे प्रवाशांमध्ये एम-इंडिकेटर अधिक लोकप्रिय झाले आहे. आता हे इंडिकेटर मुंबई शहराबाहेरील प्रवाशांचेही मार्गदर्शक ठरणार आहे. या अॅप्लिकेशनमध्ये आता एसटीचे वेळापत्रकही असणार आहे. तसेच वाहतुकीसंबंधित चॅटिंगही करता येणार आहे.

एम-इंडिकेटरमध्ये एसटीचे वेळापत्रक, मार्ग यासारख्या बाबींचा तपशील असेल. त्यासाठीचे मॉडेल अंतिम टप्प्यात असून दोन ते तीन महिन्यांत वापरासाठी तयार होईल, असे अॅप्लिकेशनचा निर्माता सचिन टेके याचे म्हणणे आहे.

एम-इंडिकेटरच्या माध्यमातून तुम्ही संवादही साधू शकता. चॅट सुविधाही २० दिवसांत कार्यरत होईल. एम-इंडिकेटरने राज्यभर पाय रोवल्यानंतर अन्य राज्यांत त्याचा विस्तार करण्यात येणार असल्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.