मोबाईल हरवलाय? गोंधळून जाऊ नका...

आपला नेहमीच सखा-सोबती बनलेला आपला मोबाईल अचानक हरवला तर... कल्पनाही करवत नाही ना... पण, असं तुमच्या-आमच्या बाबतीत कधीही घडू शकतं. 

Updated: Sep 16, 2016, 10:31 AM IST
मोबाईल हरवलाय? गोंधळून जाऊ नका... title=

मुंबई : आपला नेहमीच सखा-सोबती बनलेला आपला मोबाईल अचानक हरवला तर... कल्पनाही करवत नाही ना... पण, असं तुमच्या-आमच्या बाबतीत कधीही घडू शकतं. 

बऱ्याचदा आपण आपले फोटो, मोबाईल बँकींग डिटेल्स किंवा आपली इतर महत्त्वाची माहिती फोनमध्ये साठवून ठेवलेली असते. त्यामुळे आपली चिंता आणखीनच वाढते. पण, अशा परिस्थितीत गोंधळून जाऊ नका... तुमच्या पीएनआर नंबरवरून तुम्ही तुमचा मोबाईल शोधून काढू शकता. 

काय कराल...

- तुमच्या मोबाईलवर आत्ताच *#06# हा क्रमांक डाईल करून तुमचा आयएमईआय नंबर तुमच्याकडे लिहून ठेवा. हा १५ अंकी नंबर जपून ठेवा.

- तुमचा मोबाईल चोरीला गेला तर cop@vsnl.net वर हा १५ अंकी नंबर मेल करून तुमच्या हरवलेल्या फोनची माहिती द्या. 

- cop@vsnl.net वर तुमचं नाव, पत्ता, मोबाइल मॉडेल, मेड इन, शेवटचा वापरलेला सिम नंबर, तुमचा मेल आयडी, आएमईआय नंबर इत्यादी माहिती मेल करा. 

- यामुळे, तुमचा पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवण्याचा खटाटोप वाचू शकेल. 

- आयएमईआय क्रमांकावरून २४ तासांत आपल्या मोबाईलवर कुणी सिम कार्ड बदललं असेल तर लगेचच हा नंबर ट्रेस केला जाईल.
 
- त्यामुळे तुमच्या हरवलेल्या मोबाईलचं ठिकाण लगेचच कळू शकेल.