हे सॉफ्टवेअर सांगणार तुम्ही खरं बोलताय की खोटं

अनेकदा असं होतं की कार्यालयात काम करणारे तुमचे मित्र अथवा तुमचे सहकारी त्यांच्या फायद्यासाठी तुमच्याशी खोटं बोलतात. अनेकदा समोरचा माणूस खोटं बोलतंय हे आपल्याला कळतही नाही. मात्र आता असं होणार नाही. कारण असं सॉफ्टवेअर बनवण्यात आलंय ज्याद्वारे तुम्ही समोरचा व्यक्ती खोटं बोलतोय हे ओळखू शकाल.

Updated: Jan 10, 2016, 03:59 PM IST
हे सॉफ्टवेअर सांगणार तुम्ही खरं बोलताय की खोटं title=

नवी दिल्ली : अनेकदा असं होतं की कार्यालयात काम करणारे तुमचे मित्र अथवा तुमचे सहकारी त्यांच्या फायद्यासाठी तुमच्याशी खोटं बोलतात. अनेकदा समोरचा माणूस खोटं बोलतंय हे आपल्याला कळतही नाही. मात्र आता असं होणार नाही. कारण असं सॉफ्टवेअर बनवण्यात आलंय ज्याद्वारे तुम्ही समोरचा व्यक्ती खोटं बोलतोय हे ओळखू शकाल.

मिशिगन युनिर्व्हसिटीच्या शास्त्रज्ञांनी रियल वर्ल्ड डाटावर आधारित लाय-डिटेक्टिंग सॉफ्टवेअरचे प्रोटोटाईप बनवलेय. हे सॉफ्टवेअर पॉलीग्राफ मशीनप्रमाणे काम करते. या सॉफ्टवेअरने ७५ टक्के खरी उत्तरे दिलीत. या सॉफ्टवेअरच्या आधारे कोणता व्यक्ती खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतंय याचा तुम्ही शोध घेऊ शकता. 

वैज्ञानिकांच्या मते हे सॉफ्टेवेअर भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. पोलिसांसाठी हे सॉफ्टवेअर महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे आरोपी पकडणे सोपे होईल.