‘ओएनजीसी’मध्ये नोकरीची संधी!

ऑईल अँड नॅच्युरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड (ONGC)मध्ये टेक्निशिअन आणि ज्यू. फायरमनच्या पोस्टसाठी नोकरीची संधी आहे. २९ नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 18, 2013, 06:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ऑईल अँड नॅच्युरल गॅस कार्पोरेशन लिमिटेड (ONGC)मध्ये टेक्निशिअन आणि ज्यू. फायरमनच्या पोस्टसाठी नोकरीची संधी आहे. २९ नोव्हेंबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

१. असिटंट टेक्निशिअन (इलेक्ट्रॉनिक्स) A2 level – ८ जागा
> वयोमर्यादा: जास्तीतजास्त ३०
> शिक्षण: डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर
> पगार – १२ हजार २७ हजार
२. ज्यू. फायरमन W1 Level – ५ जागा
> वयोमर्यादा: जास्तीतजास्त २५
> महाविद्यालयीन शिक्षण सोबत फायरमन डिप्लोमा आणि ड्रायव्हिंग लायसंस
> पगार – १० हजार १८ हजार
३. निवडीची पद्धत
> निवड लिखीत परिक्षा, इंटरव्ह्यू, ड्रायव्हिंग टेस्ट
> पोस्टनुसार निवड
असिस्टंट टेक्निशिअन (इलेक्ट्रानिक्स) A2 Level :
१. लेखी चाचणी
२. मुलाखत
ज्यू. फायरमन W1 Level :
१. लेखी चाचणी
२. मुलाखत
३. शारीरीक प्रमाण चाचणी
४. शारीरीक क्षमता चाचणी
५. ड्रायव्हिंग टेस्ट
कशी असेल लेखी चाचणी:
 विषयाशी निगडीत १०० प्रश्न
 सामान्य ज्ञानाचे २० प्रश्न
 एकूण १२० मार्कांची ही परिक्षा Objective असेल.
अर्ज करण्याची पद्धत:
 अर्जाची फी १००/- (SC/ST) साठी तर रु. ३००/- इतर आणि ओबीसी उमेदवारांसाठी
 अर्जाची फी ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत चालानच्या रुपात भरावी.
 सर्व उमेदवारांनी आपला अर्ज संपूर्ण माहितीसह भरावा.
 उमेदवारी अर्जासह ओएनजीसी चालान स्लीपसह स्वत:चा फोटो आणि शैक्षणिक कागदपत्र, वयाचा दाखला, जात प्रमाणपत्र, अनुभवाचं प्रमाणपत्र इत्यादी...
 अर्जावर अर्ज कोणत्या पोस्टसाठी करतोय हे खालील पत्त्यावर पाठवावं.
 पत्ता-
DGM (IE)-Rectt., Ground Floor, B-Wing,
Green Hills, Tel Bhavan,
ONGC, Dehradun, PIN-248003

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.