या फोनला तुम्ही साबणानेही धुवू शकता...

जपानमधील दोन कंपन्यांनी विेशेष असा स्मार्टफोन तयार केलाय. यातील खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन तुम्ही साबणानेही धुवू शकता. पाण्याने या फोनला काही होणारही नाही. 

Updated: Dec 5, 2015, 02:59 PM IST
या फोनला तुम्ही साबणानेही धुवू शकता... title=

नवी दिल्ली : जपानमधील दोन कंपन्यांनी विेशेष असा स्मार्टफोन तयार केलाय. यातील खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन तुम्ही साबणानेही धुवू शकता. पाण्याने या फोनला काही होणारही नाही. 

केडीडीआय आणि क्योकेरा या दोन कंपन्यांनी बनवलेला हा स्मार्टफोन ११ डिसेंबरला लाँच केला जाणार आहे. या फोनमध्ये आयपी ५८ रेटिंग देण्यात आलीय ज्यामुळे हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि शॉकप्रूफ आहे. 

या फोनमध्ये डिस्प्लेसाठी ड्रॅगनट्रायल एक्स काचेचा वापर कऱण्यात आलाय. हा फोन गुलाबी, पांढरा आणि नेव्ही या रंगात उपलब्ध होईल. जपानमध्ये या फोनची किंमत ३२ हजार ३०० रुपये ठेवण्यात आली आहे. 

यात ५.१ अँड्रॉईड लॉलीपॉप देण्यात आले आहे. पाच इंचाचा डिस्प्ले असून २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आलीय. यात १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा आहे. तसेच ३००० एमएएच बॅटरी असून २० तासांचा टॉकटाईम आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.