आयफोन 6s, 6s+ भारतात १६ ऑक्टोबरला लॉन्च होणार

अॅपलचा आयफोन 6s, आयफोन 6s प्लस १६ ऑक्टोबर रोजी भारतात लॉन्च होणार आहे. आयफोन 6s आणि आयफोन 6s प्लसने विक्रीचा नवा विक्रम रचला आहे. 

Updated: Sep 29, 2015, 12:05 AM IST
आयफोन 6s, 6s+ भारतात १६ ऑक्टोबरला लॉन्च होणार title=

मुंबई : अॅपलचा आयफोन 6s, आयफोन 6s प्लस १६ ऑक्टोबर रोजी भारतात लॉन्च होणार आहे. आयफोन 6s आणि आयफोन 6s प्लसने विक्रीचा नवा विक्रम रचला आहे. 

'पहिल्या तीन दिवसांमध्ये आयफोन 6s आणि आयफोन 6s प्लसची शानदाक विक्री झाली आहे. पहिल्या विकेंडमध्येच विक्रीचे सगळे विक्रम मोडित निघाले आहेत.' असं अॅपलचे सीईओ टिम कूक यांनी सांगितले.  

 तसेच भारत, मलेशिया आणि तुर्कस्थानमध्ये 16 ऑक्टोबरला लाँच करण्यात येणार आहे. त्याआधी 9 ऑक्टोबरला हे स्मार्टफोन 40 देशांमध्ये लाँच करण्यात येणार असून तर 10 ऑक्टोबरला 6 देशांमध्ये लाँच करण्यात येणार आहेत.

तीन दिवसांमध्ये आतापर्यंत 1.3 कोटी युनिटची विक्री झाली झाल्याची माहिती अॅपलने दिली आहे. याआधी आयफोन 6ची विकेंडला जवळजवळ 1 कोटी युनिटची विक्री झाली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.