मोबाईल तापण्याची ३ महत्वाची कारणं आणि उपाय

अधिक स्लीम स्मार्टफोन खरेदीकडे जास्तच जास्त ग्राहकांचा कल आहे, यासाठी दिवसेंदिवस स्लीम स्मार्टफोन येत आहेत. मात्र दिवसेंदिवस अॅप आणि डेटा प्रोसेसिंगची क्षमताही वाढतेय, स्क्रीनचं रिझोल्यूशन चांगलं असल्याने व्हिडीओ पाहणंही तुमच्यासाठी सोप झालं आहे. व्हिडीओचा दर्जाही मोठ्या प्रमाणात सुधारला आहे.

Updated: Sep 28, 2015, 08:21 PM IST
मोबाईल तापण्याची ३ महत्वाची कारणं आणि उपाय title=

मुंबई : अधिक स्लीम स्मार्टफोन खरेदीकडे जास्तच जास्त ग्राहकांचा कल आहे, यासाठी दिवसेंदिवस स्लीम स्मार्टफोन येत आहेत. मात्र दिवसेंदिवस अॅप आणि डेटा प्रोसेसिंगची क्षमताही वाढतेय, स्क्रीनचं रिझोल्यूशन चांगलं असल्याने व्हिडीओ पाहणंही तुमच्यासाठी सोप झालं आहे. व्हिडीओचा दर्जाही मोठ्या प्रमाणात सुधारला आहे.

व्हिडीओ आणि मोबाईल इंटरनेटमुळे तुमचा फोन गरम होतो, असं म्हटलं जातं, मात्र नेमकं काय कारण आहे, आणि काय उपाय आहेत, हे जाणून घेणे सर्वात महत्वाचे आहे.

पण एवढं मात्र निश्चित आहे की, स्मार्टफोन प्रोसेसरवर तुमच्या वाढत्या गरजांचा ताण येतोय, त्याला जास्तच जास्त मेहनत करावी लागतेय.

अँड्रॉईड स्मार्टफोन वापरणाऱ्यांमध्ये ही तक्रार मोठ्या प्रमाणात ऐकायला येते, त्यासाठी फोन गरम होण्याची नेमकी कारणं काय आहेत, हे समजणे गरजेचे आहे.

फोन गरम होण्याची ३ महत्वाची कारणं
१) जेव्हा तुम्ही तुमच्या फोनवर अनेक अॅप ओपन ठेवतात, तेव्हा प्रोसेसरवर याचा परिणाम होतो आणि फोन गरम होण्यास सुरूवात होते. म्हणून सुरू असलेले आणि तुर्तास वापरात नसलेले अॅप तात्काळ बंद करणे गरजेचे आहे.

फोन जेव्हा चार्ज करण्यात येतो, तेव्हा तो जास्त प्रमाणात तापतो. त्यावेळी सर्व अॅप बंद ठेवणे महत्वाचे आहे.

२) जेव्हा रेडिओ सिग्नल जेव्हा कमकुवत होतात, म्हणजेच रेंज कमी असते, तेव्हा कनेक्टिविटी वाढवण्याचा प्रयत्न फोन करत असतो, याचा जोर बॅटरीवर पडत असतो. 

३) तुम्ही वायफायची सेवा घेतल्यानंतर वायफाय नेटवर्क बाहेर जातात, तेव्हा फोन सतत नवीन वायफाय नेटवर्क शोधत असतो, तेव्हाही फोन गरम होतो, म्हणून वायफाय झोन बाहेर गेल्यानंतर वायफायचं ऑप्शन तात्काळ बंद केल्यास फोन तापणे थांबेल, आणि बॅटरीचं आयुष्य सुधारेल.

फोन न तापण्यासाठी ३ साधे उपाय
१) तुम्ही थ्रीजी ऑप्शन बंद केल्यानंतर काही तासांनी थ्रीजी ऑप्शन सुरू केल्यास सर्व अॅपवरील अॅक्टीव्हिटी सुरू होतात, ज्या प्रमाणे व्हॉटस अॅपवर मेसेजेस पडणे, यामुळेही फोन तापतो आणि बॅटरी वेगाने डिस्चार्ज होते. तेव्हा बऱ्याच वेळानंतर थ्रीजी सुरू केल्यास, फोन खिशात ठेऊ नका आणि बॅटरी किती पुरवायची आहे, याचा देखील अंदाज लावा. बऱ्याच वेळाने थ्रीजी सुरू केल्यानंतर, फोन लगेच चार्ज करण्याची घाई करू नका.

२) फोन थोडाफार गरम होत असेल, तर मोठी गोष्ट नाहीय, पण जास्त गरम होणे स्मार्टफोनसाठी चांगली बाब नाही. जर असं होत असेल तर फोन खिशातून बाहेर काढून ठेवा, फोन चार्ज करतांना जास्त गरम झाला असेल तर थोडा वेळ चार्जिंगला ब्रेक द्या, बॅटरी आणि फोनचं आयुष्य वाढेल.

३) मात्र खराब नेटवर्कला काहीही उपाय नाहीय, अशावेळी तो सतत गरम होत असेल, तर त्याला थोडा वेळ बंद करा, अथवा नेट ऑप्शन तरी बंद ठेवा. तुम्ही प्रवासात ट्रेनमध्ये अथवा बाईकवर असतात, तेव्हा सतत नेटवर्क निवडण्यास फोन प्रोसेसरला मेहनत घ्यावी लागते, आणि फोन तापतो.

जर फोन जास्तच गरम होत असेल, तर एकदा आपल्या फोन कंपनीच्या गॅलरीला जाऊन सांगा, हे आपल्या सुरक्षिततेसाठी चांगलं असेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.