मुंबई : सध्या सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपची जोरदार चर्चा आहे. तरुणांनी व्हाट्सअॅपल जास्त पसंती दिलेली दिसत आहे. मात्र, हेच व्हॉट्सअॅप लाईफ टाईम फ्री तुम्हाला बिना इंटरनेट मिळाले तर! हो शक्य झालंय.
'व्हॉट्स अॅप' या मॅसेजिंग अॅपने सर्वांनाच भूरळ घातली आहे. मोबाईलवर वापरण्यात येणारं 'व्हॉट्स अॅप' आता तुमच्या कॉम्प्युटरवरही वापरणं शक्य झालं आहे. आता यापुढे एक पाऊल टाकत 'व्हॉट्स अॅप' हे तुम्हाला फुकतात वापरता येणार आहे. एकदाच ७०० रुपये मोजले की आयुष्यभर ते मोफत असेल.
आता एक असं सिमकार्ड आले आहे की, ज्यामुळे इंटरनेटशिवाय 'व्हॉट्स अॅप' वापरता येणार आहे. 'व्हॉटसिम' असं या सिमचे नाव आहे. या सिमकार्डची किंमत साधारणता ७०० रुपये आहे. हे खरेदी केल्यानंतर तुम्हाला 'व्हॉट्स अॅप' लाईफ-टाईम फ्री उपलब्ध होईल. यासाठी वेगळा रिचार्ज किंवा कोणता इंटरनेट पॅक अॅक्टिव्ह करण्याची आवश्यकता नाही.
तुमच्या मोबाईलवर इंटरनेट नसेल, तरीही या सिमकार्डमुळे तुम्ही व्हॉट्स अॅप वापरू शकाल. सध्या जगभरात दीडशे देशांमध्ये हे सिम उपलब्ध करण्यात आले आहे. तुम्ही ज्या ठिकाणी असाल, त्या ठिकाणी जे नेटवर्क उपलब्ध असेल, ते या सिममुळे तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होईल. हे सिम सर्व्हिस प्रोव्हायडरचा शोधही आपोआप घेईल. त्यामुळेच हे नवे 'व्हॉटसिम’हा नवा पर्याय तरुणांना उपलब्ध झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.