मुंबई: प्रोबेशनवर ठेवताना कर्मचार्यांवना बोनस, कंत्राट संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी निधी अशा सवलती देऊन नामवंत कंपन्या तरुण इंजिनीयर्सना आपल्याकडे आकर्षित करतात. आता त्यात आणखी एका नव्या ट्रेंडची भर पडली आहे. वार्षिक वेतनावर नेमणूक करण्याऐवजी ३-४ वर्षांचं ‘पॅकेज’ दिलं जाऊ लागलं आहे.
इंजिनीयरिंग केलेल्या उमेदवारांसाठी उद्योग जगतात खासकरून हा नवा ट्रेंड आला आहे. मुंबईतील सरदार पटेल इंजिनीयरिंग कॉलेजच्या २१ इलेक्ट्रिकल इंजिनीयर्सना अशी संधी मिळाली आहे. एमयू-सिगमा आणि ईएक्सएल ऍनालिटिक्स या कंपन्यांनी त्यांना चार वर्षांच्या पॅकेजवर नेमलं आहे. काम पाहून वेतनाव्यतिरिक्त ‘परफॉर्मन्स बोनस’ही त्यांना देण्यात येणार आहे. चार वर्षांच्या पॅकेजची ऑफर आकर्षक असली तरी अनेक उमेदवार उच्च शिक्षणासाठी ती नाकारत आहेत. ऑफर स्वीकारून संबंधित कंपनीत गुंतून पडणं त्यांना मान्य नाही. मात्र अशा ऑफर्समुळं तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ लागल्या असून आशियातील अर्थव्यवस्थेलाही बळ मिळालं आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
तीन-चार वर्षांच्या पॅकेजमुळं तरुणांना त्या कालावधीत चांगला अनुभव घेता येतो. टीमवर्क शिकता येतं. पुढील करिअरसाठी तयार होता येतं. चार वर्षांच्या निश्चिात आणि मनाप्रमाणे मिळणार्यार वेतनामुळं काम करण्याचा उत्साहही कायम राहतो. ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्यांनीही आता अशा ऑफर्स सुरू केल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.