www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जपानची कंपनी 'टोयोटा'ची इनोवा मार्केटमध्ये भलतीच हीट झाली. आत्तापर्यंत जवळजवळ चार लाख 'इनोवा' केवळ भारतात विकल्या गेल्यात. 'टोयोटा'नं हेच यश साजरं करण्यासाठी 'इनोव्हा' एका नव्या रुपात सादर केलीय. आता हीच इनोवा 'टोयोयाट'नं क्रोम स्वरुपात बाजारात आणलीय.
ही नवी कार दोन वेगवेगळ्या इंजिनमध्ये सादर करण्यात आलीय. २.५ लीटर डीझेल इंजिन १०२ पीएस आणि २ लीटर पेट्रोल इंजिन १३२ पीएस ची पॉवर देतो.ही फारच सुंदर आणि दमदार इंजिन क्षमता असलेली अशी कार आहे. ही इनोवा कार नक्कीच लोकांना आकर्षित करेल. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत ९.७७ लाख इतकी ठेवलीय.
सध्याच्या दिवसात कार कंपन्यांमध्ये एमपीवी कारसाठी स्पर्धा सुरु आहे. यामुळे महिंद्राने त्यांची एमपीवी ‘झायलो’, मारुती सुझुकीने ‘आर्टिगा’ आणि शेवरोलेने ‘एन्जॉय’ बाजारात आणल्या होत्या. या स्पर्धेत आता 'टोयोटा'नं चांगलीच बाजी मारलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.