इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती

 इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल (वाहनचालक) या ४७२ पदांसाठी तर सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये विविध पदांच्या २९  जागा भरण्यात येणार आहेत.

Updated: Feb 7, 2015, 10:11 PM IST
इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स, सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती title=

मुंबई : इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल (वाहनचालक) या ४७२ पदांसाठी तर सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये विविध पदांच्या २९  जागा भरण्यात येणार आहेत.

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स - कॉन्स्टेबल (वाहनचालक) पदाच्या ४७२ जागा
इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल (वाहनचालक) या ४७२ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०१५ आहे. अधिक माहितीसाठी http://itbpolice.nic.in/ लॉगऑन करा.

सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन - विविध पदांच्या २९  जागा
 सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये महाव्यवस्थापक (सामान्य) (२ जागा), महाव्यवस्थापक- एफ आणि ए (१), उप महाव्यवस्थापक-सामान्य (२), सहाय्यक महाव्यवस्थापक - सामान्य (३), सहाय्यक महाव्यवस्थापक-लेखा (३), सहा महाव्यवस्थापक - तांत्रिक (३), व्यवस्थापक - सामान्य (१०), व्यवस्थापक - लेखा (५) या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ फेब्रुवारी २०१५ असून अधिक माहितीसाठी www.cewacor.nic.in लॉगऑन करा.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.