आयफोन 6S आणि 6S plus च्या भारतातील किंमती अखेर जाहीर...

बहुप्रतिक्षित अशा आयफोन '6s' आणि आयफोन '6s plus' या मोबाईलची भारतातील किंमत अखेर जाहीर करण्यात आलीय. 

Updated: Oct 6, 2015, 07:29 PM IST
आयफोन 6S आणि 6S plus च्या भारतातील किंमती अखेर जाहीर...  title=

मुंबई : बहुप्रतिक्षित अशा आयफोन '6s' आणि आयफोन '6s plus' या मोबाईलची भारतातील किंमत अखेर जाहीर करण्यात आलीय. 

यावेळी आयफोन 6 आणि 5s या फोनच्या किंमतीतही घट करण्यात आलीय... आणि तुम्ही काही ई-कॉमर्स वेबसाईटवर खरेदी करत असाल तर हे फोन तुम्हाला याहून कमी किंमतीत मिळू शकतात. 

सध्या आयफोन 6s ची क्रेझ तरुणांमध्ये दिसून येतेय. यामध्ये, थ्रीडी टच, लाईव्ह फोन आणि सर्वोत्तम असा कॅमेरा देण्यात आलाय. 

आयफोनचा आणखीन एक नवीन फोन लवकरच भारतीय बाजारात धडकण्यासाठी तयार आहे. १६ ऑक्टोबर रोजी हा फोन लॉन्च होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.