iBall नं आणला जबरदस्त कॅमेराचा ड्युअल सिम फोन

 iballनं आपल्या अँडी सीरिजमध्ये नवा ड्युअल सिम स्मार्टफोन iball अँडी 4.5 एनिग्मा लॉन्च केलाय. याची स्क्रीन 4.5 इंचची आहे आणि QHD टचस्क्रीन आहे. मात्र याचं वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा आहे. हा फोन 22 भाषांना सपोर्ट करतो.

Updated: Sep 8, 2014, 01:44 PM IST
iBall नं आणला जबरदस्त कॅमेराचा ड्युअल सिम फोन title=

मुंबई:  iballनं आपल्या अँडी सीरिजमध्ये नवा ड्युअल सिम स्मार्टफोन iball अँडी 4.5 एनिग्मा लॉन्च केलाय. याची स्क्रीन 4.5 इंचची आहे आणि QHD टचस्क्रीन आहे. मात्र याचं वैशिष्ट्य म्हणजे याचा कॅमेरा आहे. हा फोन 22 भाषांना सपोर्ट करतो.

हा फोन सेल्फीसाठी परफेक्ट आहे. याचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेल आहे तर रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे. फ्रंट कॅमेऱ्यामध्ये 88 डिग्री वाइड अँगल आहे म्हणून आजूबाजूची दृश्यही कॅमेऱ्यात कॅप्चर करता येऊ शकतात. 

याचा रॅम 1 जीबी असून 8 जीबी इंटरनल स्टोरेज आहे आणि एक्सटेंशन स्लॉट सुद्धा आहे. याची बॅटरी 1500 एमएएच इतकी आहे. 

अँडी 4.5 एनिग्माची वैशिष्ट्ये

*स्क्रीन-4.5 इंच(960x540 पिक्सेल)
*प्रोसेसर-1.3 जीएचझेड क्वॉड कोर प्रोसेसर
*रॅम-1जीबी, 8जीबी इंटरनल स्टोरेज, 32 जीबी एक्सटेंशन स्लॉट
*ओएस-अँड्रॉइड 4.4 किटकॅट
*सिम-ड्युअल सिम
*आकार-8.77 मिमी, 135 ग्राम वजन
*कॅमरा-13 एमपी रिअर, एलईडी फ्लॅश, 8 एमपी फ्रंट
*ऑडियो- 3.5मिमी ऑडियो जॅक, एफएम रेडियो
*अन्य फीचर- 3जी, वाई-फाई, ब्लूटुथ, जीपीएस, एनएफसी
*बॅटरी-1500 एमएएच
*कीमत- 8,499 रुपये
*रंग- गोल्ड, पर्पल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.